☀️परभणी जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस निरिक्षकांना पोलिस निरिक्षक पदावर मिळाली पदोन्नती...!


☀️पुर्णा पोलिस स्थानकाचे बि.पी.चोरमले व परभणीतील कोतवाली पोलिस स्थानकात कार्यरत पाटील यांचा समावेश☀️

परभणी (दि.२३ फेब्रुवारी) ः परभणी जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांना राज्याच्या गृहविभागाने आज मंगळवार दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी एका आदेशाव्दारे पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती बहाल केली असून या दोन अधिकाऱ्यांमध्ये पुर्णा पोलिस स्थानकात कार्यरत बि.पी.चोरमले व परभणी शहरातील कोतवाली पोलिस स्थानकात कार्यरत विवेकानंद पाटील यांचा समावेश आहे.  

शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांची लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षक तर पूर्णा पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.पी. चोरमले यांना मुंबई शहरात नियुक्ती देतेवेळी पोलिस निरीक्षक पदावर पदोन्नती बहाल करण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या