💥हिंगोली येथे मंगल कार्यालयाच्या मालक व्यवस्थापका वर गुन्हा दाखल....!


💥जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली💥

हिंगोली : विवाह सोहळ्यास परवानगी न घेता लग्न समारंभामध्ये गर्दी जमिवल्याने शहरातील ओमसाई मंगल कार्यालयाचे मालक व व्यवस्थापकावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी रात्रीची संचारबंदी जारी केली आहे. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यासाठी परवानगी घेणे आवश्यक असून ५० लोकांच्या उपस्थितीमध्येच सोहळा साजरा करावा असे बंधनकारक आहे. शिवाय तसे आदेशही मंगल कार्यालयाना दिले आहेत. तरी सुधा शहरातील ओमसाई मंगल कार्यालयाचे मालक व व्यवस्थापक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्यात आली. तसेच ५० हजाराचा दंड देखील लावला जाणार असल्याचे पथकाने सांगितले. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी येतिश देशमुख यांच्या फिर्यादीवरून मंगल कार्यालयाचे मालक राजेश्वर सिद्धराम तुंगेनवार व व्यवस्थापक राम तुकाराम मुंढे या दोघांविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच नगरपालिकेच्या पथकातील पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, डी. पी. शिंदे, पी. बी. ठाकूर आदींनी कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या