💥परभणी तालुक्यातील संबर येथे वाळूची चोरटी वाहतुक करणारे २ टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले...!


💥स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.११ फेब्रुवारी) - परभणी तालुक्यातील संबर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या धाडसी अधिकारी-कर्मचार्‍यांच्या पथकाने काल बुधवार दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री उशीरा वाळूची अवैध वाहतुक करणारे २ टिप्पर जप्त केले.पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

परभणी तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतुक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. अवैध उत्खणन करून वाळूची चोरटी वाहतुक सर्रास होऊ लागली आहे. वाळूच्या चोरट्या वाहतुकीस पायबंद घालण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पोलिसांना दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी कर्मचारी बालासाहेब तुपसमिंद्रे, हरिचंद्र खुपसे, किशोर चव्हाण, शेख अजहर, दिलावर पठाण यांना अवैधधंद्यांची माहिती काढत कारवाईचे आदेश दिले होते. तसेच अवैध वाळू उपसा व वाहतुक करणार्‍या वाहनांवर तात्काळ कारवाईचे आदेशही त्यांनी दिले होते.बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकास संबरमध्ये वाळूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतुक होऊ लागली असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकातील कर्मचार्‍यांनी बुधवारी रात्री संबर येथे दाखल झाले. त्यावेळी संबर शिवार ते सावंगी शिवारामध्ये पूर्णा नदी पात्रात रेतीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने रेती उत्खणन करून टिप्पर क्र.एमएच २० बीटी ६८८० चा चालक व टिप्पर क्र.एमएच ०४ ईवाय ७२४२ चालक शेख शौकत उत्खणन करून रेती टिप्परमध्ये भरत असताना पोलिसांना पाहून पळून गेला. दोन्ही टिप्परच्या चालकांनी टिप्पर मालकांच्या फायद्यासाठी रेती उत्खणन तकून रेती चोरून चोरटी चोरटी विक्री करणअयासाठी बेकायदेशीररित्या विना परवाना वाहतुक करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यावरून पथकाने पूर्णा नदीत चोरून उत्खणन करीत वाळूची चोरटी वाहतुक करण्यासाठी वापरले जाणारे दोन्ही टिप्पर जप्त केले. तसेच एका चालकास ताब्यात घेतले. १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करत ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. 

हरिचंद खुपसे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस् ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी राजू राठोड हे करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या