💥दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची गळफास घेऊन आत्महत्या...!


💥मुंबईतील एका हॉटेलमध्ये आज सोमवारी त्यांचा मृतदेह आढळला💥

 दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोहन डेलकर हे अपक्ष खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील एका हॉटेलमध्ये सोमवारी त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोहन डेलकर हे 58 वर्षांचे होते. ते दादरा नगर हवेली भागातून अपक्ष म्हणून निवडून गेलेले खासदार होते. 1989 मध्ये ते पहिल्यांदा या भागातून निवडून आले होते. मोहन डेलकर भारतीय नवशक्ती पक्षाकडून खासदार म्हणून संसदेवर निवडून गेले होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या