💥सोनपेठ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने झाली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीची साखरपेरणी....!


💥तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व💥

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी

ग्रामीण भागातील गावासाठी विकासात्मक कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालाने वातावरण ढवळून निघाले असून तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात विटेकरांना यश आले आहे.ही निवडणूक म्हणजे आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पायाभरणी असल्याचे बोलल्या जात आहे.तालुक्यात एकूण ३९ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

💥२० ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात तर उर्वरित ग्रामपंचायतीत काही ठिकाणी सदस्य :- दशरथ सूर्यवंशी💥

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आलेल्या ग्रामपंचायतीत लोहिग्राम,कोठाळा,थडीपिंपळगाव,वाडीपिंपळगाव,देवीनगरतांडा,गंगापिंपरी थडीपिंपळगाव,खपाटपिंपरी,कोरटेक,नैकोटा,शेळगाव,बोंदरगाव,खपाटपिंपरी,गवळीपिंपरी,नरवाडी,उखळी(बू.),विटा(खु.),धामोनी,निमगाव यांच्यासह २० ग्रामपंचायतीचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे होतील गावपातळीवरील निवडणुका ह्या पक्षविरहीत असतात यात पक्षाचा संबंध नसतो.मात्र यात पुरस्कृत पँनल म्हणून ज्या ठिकाणी बळ लावले होते.त्या २० ते २५ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व स्थापन करण्यात यश मिळाले आहे.तर उर्वरित ग्रामपंचायतवर सदस्य म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते निवडून आले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दशरथ सूर्यवंशी यांनी केला आहे.

💥काँग्रेसच्या ताब्यात १६ ग्रामपंचायती :- प्रा.मुंजा धोंडगे💥

काँग्रेसच्या ताब्यात तालुक्यातील १६ ग्रामपंचायती आलेल्या असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मुंजा धोंडगे यांनी दिली.त्यांनी पुढे बोलताना सांगितले की.या ग्रामपंचायतीव्यतीरिक्त इतर ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते निवडून आले आहेत.यात पूर्ण बहुमताने काँग्रेसने दावा केलेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे लासीना, थडीउक्कडगाव,मोहळा,बुक्तरवाडी,भिसेगाव,शिर्शी(बु.)देवींगर,वडगाव,चुकरपिंपरी,नरवाडी,उखळी(बु.),करम,कोटाळा लोहिग्राम,वैतागवाडी आदी ग्रामपंचायतवर काँग्रेसने दावा केला आहे.

💥भाजपाच्या ताब्यात २ ग्रामपंचायती💥

भाजपने तालुक्यात आपली ताकद लावली नसल्याने केवळ २ ग्रामपंचायती पूर्ण बहुमताने भाजपच्या ताब्यात आल्या आहेत यात निळा आणि सायखेडा यातील सायखेडा येथील  निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.यात भाजपचे तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रेवडकर यांच्या पँनलला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षानी एकत्र येऊन या निवडणुकीत रेवडकरांना पराभूत करायचे असा चंग बांधला होता.मात्र तो प्रयत्न सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.यासोबतच या ग्रामपंचायत निवडणूकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना रंगल्याचीही चर्चा होत आहे.

💥कान्हेगावमध्ये प्रगतशील ग्रामविकास पँनलचे वर्चस्व💥

सोनपेठ तालुक्यातील क्रमांक २ चे सर्वात मोठे गाव असलेल्या व ग्रामपंचायत म्हणून कान्हेगावचा समावेश होतो सार्वत्रिक निवडणूक २०२१ मधील निवडणुकीतीचा कौल नुकताच हाती आला असून यात या ग्रामपंचायतीत प्रगतशील ग्रामविकास पँनलचे प्रमुख रामेश्वर मोकाशे यांच्या नेतृत्वाखाली ११ पैकी ९ जागावर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.प्रगतशील ग्रामविकास पँनलमधून रामेश्वर मोकाशे,बेबीसरोज मोकाशे,या दांपत्याने विजयी होऊन त्यांच्या पँनलमधून गणेश मोकाशे,सरोजा मोकाशे,सत्यभामा सातपुते,आशा कोरडे,नामदेव दुगाने,रुक्मिणबाई राठोड,मंगेश पाटोळे यांनी विजय मिळवला आहे.मोकाशे यांनी मागील अनेक वर्षांपासून गावातील सामान्य लोकांची कामे युवासेनेच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत त्यांना याचा राजकीय फायदा झाल्याची चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या