💥पुर्णा-नांदेड-परभणी प्रवासी रेल्ले पेसेंजर गाड्या बंद असल्याने अप-डाऊन करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ..!


💥कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून विशेष रेल्वे वगळता पेसेंजर प्रवासी गाड्या बंद सर्वसामान्यांचे हाल💥

पुर्णा (दि.१४ जानेवारी) - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अनेक प्रवासी पेसेंजर रेल्वे गाड्या बंद केल्याने सर्वसामान्य प्रवासी तसेच परभणी-नांदेड येथे कामासाठी जाणाऱ्या रोजमजूर कामगारांची अक्षरशः कुचंबना होत असून पुर्णा तालुक्यातून परभणी-नांदेड येथील मेडीकल,कापड दुकान,किराणा दुकान,इलेक्ट्रिक तसेच इलेक्ट्रॉनिक्स दुकान,ॲटोमोबाईल्स,खाजगी रुग्णालयात कामासाठी जाणारे कामगार,भाजी-पाला विक्रीसाठी शेतकरी,व्यापाऱ्यांवर प्रवासी रेल्वे पेसेंजर बंद असल्याने व विशेष प्रवासी रेल्वे एक्सप्रेस गाड्यांना सर्वसाधारण टिकीट बंदी असल्याने कामाअभावी अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याची भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून परभणी-नांदेड अपडाऊन करणाऱ्या या कामगारांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रतिमहिणा पेसेंजर गाडीसाठी २४० रुपये तर एक्सप्रेस गाडीसाठी प्रतिमहिणा ३६० रुपयें लागत होते त्यामुळे प्रतिमहिणा पाच ते सहा हजार रुपयांवर काम करणाऱ्या या कामगारांना परवडत होते परंतु प्रवासी पेसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने व विशेष एक्सप्रेस गाड्यांना आरक्षण टिकीटा शिवाय टिकीट परवानगी नसल्याने या कामगारांना काम सोडून घरी बसण्याशिवाय पर्याय नाही कारण खाजगी बस ट्राव्हल्स चालकांनीही तिकीट दर वाढवून एका व्यक्तीस नांदेडला जाण्यास ५० रुपये येण्यास ५० रुपये तिकीट दर केल्याने प्रतिमहिणा पाच ते सहा हजार रुपये पगार मिळणाऱ्या या कामगारांना अपडाऊन करीता महिण्यापोटी ३ हजार रुपयें कुठून परवडणार ? असा गंभीर प्रश्न संबंधित कामगारां समोर उपस्थित झाल्याने निदर्शनास येत आहे पुर्णेतून नांदेडला दररोज अपडाऊन करणाऱ्या कामगारांची संख्या अंदाजे २०० ते २५० एवढी असून पुर्णेहून परभणीला कामासाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या अंदाजे १५० ते २०० इतकी आहे तर पुर्णा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे १५० च्या जवळपास असून या कर्मचाऱ्यांना सुध्दा प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने सर्वसामान्य प्रवाश्यांसह रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी सर्वसामान्य प्रवासी वर्गाच्या सोईसाठी प्रवासी रेल्वे पेसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी होती अखेर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने सामान्य प्रवाशांना दिलासा देत येत्या १९ जानेवारी २०२१ पासून  विभागाने पुर्वी प्रमाणे सामान्य प्रवाश्यांना गाडीच्या वेळे नुसार तिकीट देण्याचे आदेश रेल्वे स्थानका वरील तिकीट वेंडीग मशीन चालकांना दिले असल्याने आता पुर्णा येथून नांदेड-परभणीस अपडाऊन करणाऱ्या असंख्य कामगारांच्या हाताला आता पुन्हा काम मिळणार आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या