💥 श्रीमान रायगड...स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड.....🚩


💥आपला रायगड🚩आपली पंढरी🙏🚩 अशा अवस्थेत असावी?

आज खऱ्या अर्थाने रायगडाच दर्शन झालं दर दिवशी हजारो शिवभक्त या पवित्र ठिकाणी महाराजांचे दर्शन घेन्या करता येत असतात. चांगली गोष्ट आहे आपला इतिहास आपण जपला पाहिजे, खरं तर आपला इतिहास नाही जपला तर येणाऱ्या पिढीला पाठीमागे काहीच शिल्लक राहणार नाही .सुमारे पहाटेचे सहा वाजले असतील, सूर्योदय नेमकाच होणार होता .त्याचक्षणी आम्ही गड चढण्यास सुरुवात केली होती. शुद्ध हवा त्यात  धुक्याची चादर पडलेली आणखीनच त्या रायगडाला शोभून दिसत होती.काही अंतर चालल्यानंतर आपणास स्वर्गाचा दरवाजा लागतो. म्हणजेच महादरवाजा, महादरवाज्याच दर्शन घेऊन आम्ही पुढील प्रवास सुरू ठेवला ,काही अंतर कापल्यानंतर तुमच्या नजरेच्या टप्प्यात पडतो तो हत्तीचा तलाव आणि त्यालाच लागून असलेला गंगासागर तलाव, गंगासागर तलावाच्या उजव्या बाजूलाच दोन उंच गगन छेदी मनोहरे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.हे भव्य दिव्य उंच दोन मनोहरे जणू श्रीमान रायगडाची देखभाल करत आहेत कि के असा भास आपणांस अलगदच होईल. पाठीमागे राज सदर, खलबतखाना ,राणीवसा, मंत्रिमंडळ या सर्वांचे वाडे होते. आणि त्याला लागूनच असलेला राजदरबार आणि राजदरबाराच्या समोर दिमाखात उभा असलेला नगारखाना हे सर्व पाहताना प्रत्येकाला इतिहासाची अनुभती येईलच असे  म्हणावयास  काहीच हरकत नाही.   नगरखान्यातून बाहेर पडतांना थोडस अंतर पुढं गेल्यास आपणांस डाव्या बाजूला महाराजांची मूर्ती आणि रिकामी जागा दिसेल,तो होळीचा माळ आहे. त्या होळीच्या माळावर असलेली महाराजांची मूर्ती जणू साक्षात देवच🙏 

 त्या होळीच्या माळाच्या समोरच अर्धवट पडलेल्या भिंती त्यांची चबुतररे नक्कीच बाजारपेठ असावी. हो ती बाजारपेठच आहे .ती आजही पावणेचारशे वर्षानंतर जशीच्या तशी आहे. बाजारपेठेतुन चालतांना वेळोवेळी महाराजांच्या दूरदृष्टीचा आपणास अनुभव येऊन जाईल. बाजारपेठेतून पुढे चालताना  डाव्या बाजूला टकमक टोक आपणास पाहायला मिळेल आणि उजव्या बाजूला  श्री जगदीश्वराचे मंदिर आपल्या नजरेच्या टप्प्यात येईल ,या पवित्र मंदिराच दर्शन घेऊन,सेवेची पायरी ओलांडताना हिरोजी इंदोलकरांची आठवण झाली.🙏एवढा प्रचंड,स्वर्गा पेक्षाही सुंदर असणारा रायगड बांधणाऱ्या इंदोलकरांनी महाराजांना फक्त एक पायरीचा दगड का माघीतला असावा आज त्याची खरी अणुभती आली.धन्य ते हिरोजी इंदोलकर🙏🚩

💥सेवेची पायरी ओलांडल की समोर एका महान पराक्रमी राजाची समाधी म्हणजेच छत्रपति श्री शिवाजी महाराजांची समाधी🙏



 वरचा स्वर्ग आणि त्यातले देव कसे असतील तर  ते माहीत नाही.पण पृथ्वी वरचा देव आणि आणि त्या देवाचा स्वर्ग मात्र मी डोळेभरन पहात होतो.समाधी पुढे गेल्यानन्तर दोन्ही डोळे भरून आले होते,श्वास रोखला गेला ,मन अस्वस्थ झालं, या अखंड विश्वाचा देव त्या ठिकाणी चीर निद्रेत होता.😢😢 अख्या पृथ्वीवर याहून पवित्र जागा असूच शकत नाही.😢कंठ दाटुन आला होता,वाटत होतं समाधीला कवटाळून जोरात हंबरडा फोडावा.😢😢आणि म्हणावं महाराज..उठा..उठा महाराज😢😢..पण मनातील भावनेचा उचम्बळा तसच हमसु हमसु रडत त्या पवित्र समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा एकदा त्या अष्टकोनी स्वर्गाकडे पाहून मुजरा करून जगदीश्वर मंदिराला वळसा बाहेर पडलो, तर जगदीश्वर मंदिराच्या बाहेर पडताना उजव्या बाजूस सहज नजर गेली. पहातो तर काय, प्लास्टिकच्या बॉटल चा आणि आणि चिप्स च्या पाकिटांचा खच पडलेला.जसजसा समोर जात होतो तसतसा तो कचरा वाढत जात होता, अगदी मंदिराला लागून.चक्क श्रीमान रायगडावर हे दृश्य पाहून मनाला फार लागलं. पुढे थोडा चालत गेलो तर सर्व वाटेनं खूप सारे चॉकलेट चे व्हेपर्स, कुरकुरे ,चिप्स चे पाकीट,पाण्याच्या रिकाम्या बॉटल्स  पडलेल्या दिसल्या, आणि लगेचच आम्ही तो सर्व कचरा जमा करण्यास सुरुवात केली .पण आम्ही जमा तरी किती करणार हा कचरा कारण हा वाढतच जात होता.कुतुहूलाने पाहत होतो येणारा प्रत्येक जण फोटो काढतोय, गड अनुभवतोय ,तिथल्या निसर्गाचा पूर्णपणे आनंद घेतोय, पण आमच्या व्यतिरिक्त एकाला ही त्या ठिकाणचा कचरा उचलून  टाकावा असं वाटलं देखील नाही. पाण्याची बॉटल तर प्रत्येकाच्या हातात होती आणि खायचा खाऊ देखील. म्हणजे 2700 फूट उंचावर जाऊन आपण त्या पवित्र स्थळी जाऊन अस वागतोयत.

💥आपला रायगड🚩आपली पंढरी🙏🚩 अशा अवस्थेत असावी?



समाधीच्या डाव्या बाजूला जर पाय वळवले तर अक्षरशः स्वतःचीच लाज वाटेल इतका प्लास्टिक कचरा साठलेला आहे.

अखंड हिंदुस्थानाच दैवत🙏🚩 असलेल्या छत्रपती शिवराय यांचे गड  🚩म्हणजे भटक्यांसाठी आणि दुर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहेत.

त्यात रायदुर्ग🚩 म्हणजे कित्येकांच श्रद्धास्थान.

पण हा दगडामातीतला स्वर्ग जेव्हा प्लास्टिक ने बुजला जाईल तेव्हा आपल्या गडांचा ऱ्हास होण्यामागे इंग्रज आणि मोघलाईपेक्षा  कितीतरी पटीने जास्त कारणीभूत  गाडावर प्लास्टिक कचरा करणारी ही नालायक मंडळी असतील .

स्वराज्याची जनता सुरक्षित ठेवण्यासाठी जिथे आमच्या मावळ्यांनी रक्त सांडलं ...

आम्ही किती नालायक आहोत की याच पवित्र गडांवर आम्हीच घाण करतो.

गडावरचा तो प्लास्टिक कचरा , त्या पाण्याच्या बाटल्या  ...


 जीव तुटतोय रे आमच्या किल्ल्यांचा श्वास अशा पद्धतीने कोंडल्यामुळे.

कधी जागे होणार तुम्ही ? 

बरं गडांवर तुम्ही कचरा उचलावा अशी अपेक्षा नाहीच कोणाची, पण निदान स्वतः कचरा करू नका रे.

अनेक प्रश्न पडत होते.....

 रायगडावर प्लास्टिक चां कचरा करून आपण महाराजांशी बेईमानी करतोय असं वाटत नाही का?

केलेल्या उपकाराची आपल्याला थोडी सुद्धा जाण नाही का?

खरंच गडकिल्ले फक्त फोटो काढणे आणि हिंडण्यासाठी आहेत का?

साधी रिकामी पाणी बाटली तुम्ही खाली घेवून येवू शकत नाही का?

मग मुघल आणि तुमच्यात काय फरक आहे का?

 का येतात असे लोक गडकिल्ल्या वर?

आमच्यामध्ये थोडीदेखील माणुसकी शिल्लक नाहीये का??

अशा अनेक प्रश्नांनी डोकं विचार करून करून थकला होत.

बाबांनो आपणा सर्वांना हात🙏 जोडून विनंती आहे .जर कचरा उचलता येत नसेल तर, किमान कचरा करु तरी नका त्या पवित्र स्थळाचा आदर करा.🙏🙏🚩🚩

गडकिल्ले जिवंत राहिले तरच स्वराज्याचा इतिहास जिवंत राहील. 

दि.16/01/2021 श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहोळ्या निमित्त आयोजित 

स्वराज्यातील सर्व गडकोट प्लास्टिक मुक्त मोहीम आयोजक 'स्वप्नदुर्ग ट्रेकर्स' च्या संस्थापिका 

💥कु.वर्षा विलास चासकर पत्ता:-रा. चास ,राजगुरू नगर, ता.खेड   जि.पुणे 

💥लेखन:- प्रा.राजू कोंडीराम कदम रा.कंतेश्वर ता.पुर्ण परभणी स्वप्नदुर्ग ट्रेकर्स 🚩

  दुर्ग वेडे आम्ही सह्याद्रीचे "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या