💥पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीची विजयी घौडदौड.....!



💥भाजपासह अन्य पक्षांना ग्रामीण भागातील मतदारांनी दाखवली घरची वाट💥

परभणी (दि.१८ जानेवारी) - जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात एकंदर ग्रामपंच्यायत निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची सर्वत्र आघाडी घेत विजय प्राप्त केल्याचे दिसत असून भाजपासह अन्य पक्षांना मात्र ग्रामीण भागातील जनसामान्यांनी स्पष्टपणे नाकारल्याचे दिसत असून तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणूक मतदान प्रक्रियेत शिवसेना हा पक्ष प्रमुख गावकारभारी म्हणून पुढे येतानाचे चित्र दिसतंय...


तालुक्यातील ग्रामपंच्यात निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली आहे त्यात महाविकास आघाडीला ग्रामीण जनतेने मोठी पसंती दिल्याचं चित्र आहे...पुर्णा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकवल्याचं दिसतंय तर तालुक्यात भाजप ग्रामीण भागात फारसा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरल्याचे चित्र स्पस्ट आहे...

शहरातील नांदेड टी पॉईंट वर नवनर्वाचित गावकरभाऱ्यांचा जाहीर सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला,यावेळी श्री कदम यांनी शिवसेनेला भरभरून मतदान केल्याबद्दल जनतेचे जाहीर आभार मानले तर सोंना येथील नवनिर्वाचित सरपंच शरद कदम यांनी जनतेच्या उपकाराची परतफेड विकासात्मक कामे करून करणार असल्याची ग्वाही दिली




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या