💥परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट करणार...!


💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर शासकीय दवाखान्याची यंत्रणांकडून तपासणी💥

परभणी (दि.९ जानेवारी) - भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे तातडीने फायर ऑडीट करून घेण्याबाबत सूचना केल्या आहेत. संबंधित यंत्रणेकडून तपासणी करण्यात आली असून तेथील वीज उपकरणांसह फिटिंगची पाहणी करत उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिलासाशी बोलताना दिली.


भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट करून घेण्याबाबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सूचना दिल्या. दवाखान्यातील संपूर्ण फिटिंगची, उपकरणांची तपासणी करावी, असे आदेश त्यांनी दिले. 

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी फायर ऑडीटसाठी संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार केला. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. असे प्रकार घडू नयेत, त्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी येथे सतर्कता म्हणून आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी शासकीय रुग्णालयातील संबंधित यंत्रणेस सूचना केल्या. विशेषतः शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता बाल विभाग या कक्षाची पाहणी करून तेथील यंत्रणा, उपकरणे, एसीची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर फायर ऑडीट करून घेण्याबाबत पत्रव्यवहार करीत संबंधित यंत्रणेस पाचारण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रकाश डाके, डॉ. भगवान धुतमल, डॉ. विशाल पवार आदींनी अतिदक्षता विभागांची पाहणी केली. तेथील वीज यंत्रणेसह उपकरणांची पाहणी केली.

दरम्यान, संपूर्ण दवाखान्याचे वर्षातून एकदा फायर ऑडीट करण्यात येते. सर्व यंत्रणांची, उपकरणांसह अऩ्य बाबींची तपासणी करण्यात येते. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विविध विभागातील वीज यंत्रणेसह उपकरणांची पाहणी केली. संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांसह अन्य अधिकारी - कर्मचार्‍यांना याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर फायर ऑडीटबाबत संबंधित यंत्रणेशी चर्चा केली, असल्याचे शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी म्हटले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या