💥परभणीतील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात शॉटसर्कीट मुळे लागली आग...!


💥शॉटसर्कीट मुळे लागलेल्या आगीत एसी खुर्च्यांसह अन्य साहित्य जळून खाक💥

परभणी (दि.२३ जानेवारी) - येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील एका बैठक हॉल मधे शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत एसी खुर्च्यांसह व अन्य साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार दि.२३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास घडली.


दरम्यान घटनास्थळावर अग्नीशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे समजते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सकाळी अकराच्या सुमारास कुलगुरूंच्या कॅबीनच्या बाजूस असलेल्या एका हॉलमधून अचानक धूर निघू लागला. तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी - कर्मचार्‍यांनी तातडीने ही बाब अग्नीशमन दलास कळवली. माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी दिपक कानोडे, फायरमॅन डी.यू. राठोड, मदन जाधव, मदतनीस गणेश गायकवाड, वाहनचालक एस.के. मौलाना, जलील अहेमद खान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आग विझवली. या घटनेत हॉलमधील एसीसह खुर्च्या जळाल्या.

यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या