💥सोनपेठ शहरात मानसिक तणावातून विवाहीत तरुणीची आत्महत्या...!


💥मकर संक्रांतीच्या सनाच्या दिवशीच गळफास लावून संपवले जीवन💥

सोनपेठ (दि.१४ जानेवारी) शहरातील विवाहीत तरुणी सीमा शाम चिंचाने हिने मानसिक तणावातून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि.१४ जानेवारी २०२१ रोजी सोनपेठ शहरात घडली आहे.ऐन संक्रात सणाच्या दिवशी झालेल्या या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,विवाहीत तरुणीच्या लहान भावाची लग्नानंतर झालेली पती-पत्नीतील विसंगता आणि त्यातून देण्यात आलेल्या सोडचिठ्ठीमुळे आपल्या भावाचे कसे होईल या विवंचनेतून या तरुणीने आत्महत्या केल्याची माहीती तरुणीचा भाऊ अशोक गायकवाड यांनी दिली आहे.फोटोग्राफी व्यवसाय करणारा शाम दत्तात्रय चिंचाने याची ती तरुणी पत्नी होय.ऐन संक्रात सणाच्या दिवशी झालेल्या या आत्महत्येमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कान्स्टेबल वचिष्ट भिसे, वंजारे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या