💥परभणी तालुक्यातील कारेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची जुगार अड्यावर धाडसी कारवाई..!


💥धाडसी कारवाईत जुगार खेळणार्‍या तिघा आरोपींसह १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.२१ जानेवारी) जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी काल बुधवार दि.२० जानेवारी २०२१ रोजी तालुक्यातील कारेगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्यावर धाकण्याची धाडसी कारवाई केली यावेळी पथकाने जुगारड्यांकडून जुगार साहित्य व ८ हजार ८२० रुपये नगदी ३ मोटारसायकल २ मोबाईल असा एकून १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ३ जुगारड्यांना ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना कारेगाव शिवारात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी श्री.आलेवार यांच्यासह कर्मचारी हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, हरिचंद्र खुपसे, अजर पटेल, शेख मोबीन, दिलावर पठाण आदींनी छापा टाकला. त्यावेळी तेथे काहीजण जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलिस आल्याचा सुगावा लागताच तेथील चार जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. तर पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ हजार ८२० रुपये नगदी व ३ मोटारसायकल, २ मोबाईलसह जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला...

या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या