💥पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना-युवा सेनेची पालेमुळे रोवणारा युवा सेनेचा निस्वार्थ पदाधिकारी....!

 


💥युवा सेना उपजिल्हा प्रमुख माणिकराव सुर्यवंशी यांचा आज ११ जानेवारी रोजी वाढदिवस💥 

✍️व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - चौधरी दिनेश (रणजीत सी.)

परभणी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी या अल्पभुधारक शेतकरी कुटुंबातील सुपुत्राने २१ सप्टेंबर १९९९ रोजी सक्रीय समाज कार्यातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली प्रथमतः अखील भारतीय मराठा महासंघ संघटनेच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी शिबीरात सक्रीय सहभाग नोदवून समाजातील वृध्दांना आधार देण्याचे कार्य केले यानंतर त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन २००१ सन २००५ या कालावधी साठी त्यांची अ.भा.छावा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.


माणिकराव सुर्यवंशी यांनी अ.भा.छावा संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेताच त्यांनी आपणे जन्मगाव असलेल्या पुर्णा तालुक्यातील मौ.निळा गावातील पुनर्वसन होणाऱ्या घरांच्या बोगस कामाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर पाच दिवस उपोषण करीत पुनर्वसनाच्या होणाऱ्या बोगस कामा विरोधात बंड पुकारले यावेळी संबंधित गुत्तेदाराने ३२ बोगस घर भुईसपाट करून घरांची पुनरबांधनी केली पुर्णा तालुक्याचा गंगाखेड विधानसभा मतदार संघात समावेश झाल्यानंतर माणिकराव सुर्यवंशी यांची राजकीय कारकिर्दीला खरी सुरूवात झाली गंगाखेड विधानसभा मतदार संघातील तत्कालीन शिवसेना-भाजप उमेदवार मधुसुदन केंद्रे यांच्या सक्रीय प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली व युतीच्या उमेदवाराला मौ.निळा गावातून मोठे मताधिक्य मिळवून दिले यानंतर मौ.निळा-महागाव हा ३ किलोमीटरचा रस्ता व दिड दिड किलोमीटरचे दोन रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी यशस्वी संघर्ष करीत रस्त्याचा प्रश्न मिटवला यानंतर पाथरी विधानसभा मतदार संघाच्या तत्कालीन शिवसेना आमदार मिराताई कल्याणराव रेंगे पाटील यांनी माणिकराव सुर्यवंशी यांची कार्यतत्परता व जिद्द पाहून त्यांना पुर्णा तालुका युवा सेना प्रमुख पदाची जवाबदारी बहाल केली यानंतर तब्बल सात वर्षे तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेना-युवा सेनेचे पालेमुळे रुजवण्याची यशस्वी जवाबदारी त्यांनी पार पाडली या पदावर कार्यरत असतांना त्यांनी डिग्रस बंधाऱ्यातील तालुक्याच्या हक्काचे पाणी नांदेड जिल्ह्यात सोडण्यास तिव्र विरोध करीत धानोरा काळे येथे तब्बल तिन तास रास्ता रोको आंदोलन केले यानंतर दि.७ डिसेंबर २०१६ रोजी धानोरा काळे येथील पुलाची उंची वाढवण्याची मागणी त्यांनी केली ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्द होऊन त्या पाण्याचा शेतीला फायदा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन जिल्हाधिकारी महिवाल यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली त्यांच्या या मागणीला नांदेड येथील तत्कालीन आमदार व हिंगोली जिल्ह्याचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे ही खंबीर पाठबळ मिळाले व धानोरा काळे येथील पुलाची उंची वाढवण्या करिता तब्बल १० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला परंतु संबंधित पुल पुरातन असल्याने व उंची वाढवण्यास योग्य नसल्याने या पुलापासून १९ मीटर लांबीवर नवीन पुलासाठी पुन्हा निधीत वाढ करून २४ कोटी रुपयें मंजूर करण्यात आले ज्या पुलाचे बांधकाम प्रगती पथावर आहे.शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या माणिकराव सुर्यवंशी यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात युवा सेनेसह शिवसेनेची पालेमुळे रोवण्याचे महत्वपूर्ण कार्य यशस्वीपणे पार पाडले परंतु राजकीय क्षेत्रात वावरतांना पक्षनिष्ठा आणि इमानदारीला यत्किंचितही किंमत नसते त्यामुळे माणिकराव सुर्यवंशी यांना राजकीय क्षेत्रात म्हणावे तितके यश मिळाले नसले तरीही सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःचे एक वेगळे वर्चस्व निर्माण केले असल्याने जिल्ह्याचे विद्यमान लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी माणिकराव सुर्यवंशी यांना वेळोवेळी सन्मानपुर्वक वागणूक देत त्यांची युवा सेनेच्या उपजिल्हाध्यक्ष पदावर वर्णी लावून त्यांच्यातील पक्षनिष्ठतेचा यथोचित सन्मान केला असल्याचे निदर्शनास येत असून अश्या या इमानदार व पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहणाऱ्या युवासेना उपजिल्हाध्यक्ष माणिकराव सुर्यवंशी यांचा आज ११ जानेवारी २०२१ रोजी वाढदिवस असल्याने त्यांना जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवारासह शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाकडून वाढदिवसाच्या शतशः हार्दिक शुभेच्छा....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या