💥परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या ग्राम पंचायत सदस्यांचा रविवारी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात संवाद मेळावा...!


💥मेळाव्यात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार सत्कार💥 

परभणी (दि.२२ जानेवारी) - जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या ग्राम पंचायत सदस्यांचा परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात रविवार दि. २४ जानेवारी रोजी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

     ग्राम पंचायत सदस्यांना आपल्या गावाच्या विकासासंदर्भात शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती व्हावी, यासाठी परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात येणार आहे. 

     सकाळी ११ वाजता होणार्‍या या मेळाव्यास परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे व शिवसेनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. 

   तरी शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे. महिला सदस्यांनी सुद्धा या मेळाव्यास अवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या