💥इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द....!


💥इंग्लंडमधील कोविड-१९ परिस्थिती बघता या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली💥

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. आगामी प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याच्या भारताच्या निमंत्रणाबद्दल पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा एकदा धन्यवाद दिले. मात्र, सध्याची इंग्लंडमधील कोविड-१९ परिस्थिती बघता या सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नजीकच्या भविष्यात भारताला भेट देण्याचा मनोदय असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

इंग्लंडमध्ये उत्पन्न झालेली अपवादात्मक परिस्थिती समजून घेत असल्याचे सांगत या साथीवर वेगाने नियंत्रण मिळविता येण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. सद्यस्थिती निवळल्यानन्तर लवकरात लवकर इंग्लडचे पंतप्रधान जॉन्सन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे मोदी यांनी सांगितले.कोविड-१९ प्रतिबंधक लसी जगाला उपलब्ध करून देण्यासह विविध क्षेत्रात उभय देशांत सध्या असलेल्या सहकार्याबद्दल यावेळी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. ब्रेक्झिट नंतरच्या काळात तसेच कोरोनोत्तर काळात भारत-इंग्लंड भागीदारी अधिक बलवान होईल असा विश्वास उभय नेत्यांनी व्यक्त केला. तसेच हे अंतःसामर्थ्य प्रत्यक्षात आणण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी एकत्रित काम करण्यास दोघांनी सहमती दर्शविली.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या