💥धावत्या नांदेड-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये चोरीची घटना....!


💥औरंगाबाद ते लासूर स्टेशन दरम्यान घडली घटना रेल्वे सेना टीम व  शिल्लेगाव पोलीस पथकाची शोध मोहिम💥 

औरंगाबाद (दि.३० जानेवारी) नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस या धावत्या प्रवासी एक्सप्रेस गाडीमध्ये चोरीची घटना घडल्याने प्रवासी वर्गात खळबळ माजली असून रेल्वे प्रवासी सेना टीम व शिल्लेगाव पोलीस स्थानकाचे भरारी पथक यांच्या संयुक्त पथकाची शोध मोहीम जारी आहे. 

दरम्यान संयुक्त पथकाने ३ संशयित महिला १ अल्पवयीन मुलीस शोधून काढण्यात यश  मिळवले असून चौघांना रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल कडे मध्यरात्री स्वाधीन केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या