💥जन्म तिथे मृत्यू....सत्य तिथे असत्य....मग घात तिथे प्रतिघात तर असणारच ना ?

 


💥मदमस्त झालेल्या मनुष्यरूपी हिंस्र पशुंना उपकाराची यत्किंचितही जाण नसते💥 

जन्म तिथे मृत्यू....सत्य तिथे असत्य....मग घात तिथे प्रतिघात तर असणारच ना ? अहो तुम्ही जर या भुतलावर जन्माला आला आहात ना तर तुम्हाला मृत्यूला सुध्दा सामोरे जावे लागणारच ना ? त्याच प्रमाणे तुम्ही जर असत्य आणि पापाच्या मार्गावर चालत असाल तर एक गोष्ट निश्चितच लक्षात ठेवा तुम्हाला सुध्दा प्रखर सत्याचा सामना करीत शेवटी स्वतःच्या पापांचे प्रायश्चितही तर करावे लागणारच ना ? तुम्ही कदाचित् या भ्रमात राहत असाल की तुम्ही एखाद्या निर्मळ मनाच्या निष्पाप व्यक्तीचा घात केल्यानंतर तुमच्यावर प्रतिघात होणारच नाही तर हा तुमचा निश्चितच गैरसमज म्हणावा लागेल कारण एक गोष्ट लक्षात ठेवा दुश्मणाने सन्मानाने भेटण्यासाठी बोलावल्यानंतर त्याने दिलेल्या निमंत्रणाचा आदर म्हणून अगदी सिंहासारखे त्याला भेटण्यासाठी गेलेल्या निथड्या छातीच्या माझ्या महापराक्रमी शुर छत्रपती शिवाजी राज्यांना या गोष्टीचा अंदाज आलाच होता ना की हा प्रेमाने भेटण्यासाठी बोलावणारा शेवटी कपटी शत्रूच तो आपला घात निश्चितच करणार मग आपणालाही प्रतिघाताच्या पुर्व तय्यारीने वाघ नखांसह जावे लागणारच ? गळाभेट घेऊन पाठीत खंजर घुपसणाऱ्या त्या अहंकारी अफजल खानाला काय माहित होते आपण केलेल्या घातकी दगलबाजी नंतर आपल्यावर झालेला प्रतिघात आपल्या आतड्या बाहेर पडण्यास कारणीभूत ठरणार म्हणून शेवटी घात केल्यानंतर प्रतिघात तर होणारच ना ? युध्दात अनेक वेळा शरण आलेल्या अफगानी दरोडेखोर महंम्मद घौरीला सुधारण्याची एक संधी म्हणून वेळोवेळी अगदी निर्मळ हृदयाने त्याला क्षमा करणाऱ्या सम्राट पृथ्वीराज चौहाण यांना याची अगदी शंभर टक्के कल्पना असेलच ना की हा निरुपकारी दगलबाज विषारी साप जिवंत सोडून दिल्यानंतर एक दिवस याच मातीतल्या काही आस्तीनच्या सापांचा आधार घेऊन आपणाला निश्चितच डसणार आहे परंतु अत्यंत धर्माभिमानी असलेल्या सम्राट पृथ्वीराज चौहाण यांनी 'शरण आलेल्या शरणागताला मरण देणे हा शुरविराचा धर्म नाही' या धर्मतत्वावर कायम राहून आपल्या धर्मतत्वांचे शेवट पर्यंत पालन करीत शेवटी पुन्हा डसलेल्या त्या विषारी सापाला त्याच्याच देशात अफगाणीस्थानात ठेचलाच होता ना....अहो जिथे घात करणारी घातक अपप्रवृत्ती असते तिथे अश्या अपप्रवृतीवर प्रतिघात तर होणारच ना ? अहो ज्या अत्याचारी जनरल डायर आणि जनरल ओडवायर या राक्षसी प्रवृत्तीच्या इंग्रजांनी अमृतसर येथील जालियनवाला बागेत हजारो निरपराध भारतीयांवर अंधाधूंद गोळीबार करून भयंकर हत्याकांड घडवून भारतीयांचा घात केला त्या राक्षसी प्रवृत्तीला त्याच्याच देशात इंग्लंड मधील किंगस्टन हॉल मध्ये शुरविर सरदार शहिद उधमसिंघांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्या खावून शेवटी प्रतिघाताला सामोरे जावेच लागले ना ? अहंकारात मदमस्त झालेल्या मनुष्यरूपी हिंस्र पशुंना उपकाराची यत्किंचितही जाण नसते अश्या निरूपकारी हिंस्र पशुंना सुध्दा शरण आल्यानंतर क्षमा करणे हा शुरविरांचा खरा धर्म असतो परंतु धर्म संस्कारांचे पालन करीत असतांना भ्रमात वावरणारी अधर्मी प्रवृत्ती शैताडणार याची जाणीव तर प्रत्येकाला असायलाच हवी ना ? शेवटी याला रक्तदोषच तर जवाबदार असतो ना ? पतीवर्तेच्या पोटी शुरवीर जन्म घेतात अन् कळवदनीच्या पोटी बोटकरी बांडगूळच जन्माला येत असते ना....?  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या