💥पुर्णा-ताडकळस मार्गावर निष्काळजी पणाने वाहन चालवणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने घेतला मोटरसायकलस्वाराचा बळी...!


💥दुर्दैवी घटने प्रकरणी पुर्णा पोलिस स्थानकात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल💥

पूर्णा (दि.२४ जानेवारी) - पुर्णा-ताडकळस मार्गावर एका अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवत मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने या धडकेत ३६ वर्षीय तरुण प्जारकाश मनोहरआप्पा खाकरे रा.कानडखेड तालुका पुर्णा हा ठार झाल्याची घटना खुजडा शिवारात काल शनिवार दि.२३ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती या घटने प्रकरणी पुर्णा पोलिस स्थानकात प्रथमतः अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती परंतु या घटने प्रकरणी मयताचे चुलते मलकार्जून विश्वनाथ खाकरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलिस स्थानकात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुरनं. ३६/२०२१ कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या