💥पुर्णा तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेचा दणदणीत विजय....!


💥मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेचे ९ पैकी ७ उमेदवार विजयी💥

पुर्णा (दि.१८ जानेवारी) - तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणदणीत विजय प्राप्त केला असून आज सोमवार दि.१८ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या मतमोजणीत मनसेचे ९ पैकी ७ उमेदवार विजयी झाले आहेत. 

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख (सोनटक्के) यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेचे ९ पैकी ७ उमेदवार विजयी झाल्याने आता तालुक्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हळुवारपणे आपले वर्चस्व निर्माण करीत असल्याचे निदर्शनास येत असून या घवघवीत विजया बद्दल मनसेच्या विजयी सात ग्रामपंचायत सदस्यांसह जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष अनिल बुचाले,शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर,उपशहराध्यक्ष राजेश यादव,पंकज राठोड यांनी अभिनंदन केले आहे....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या