💥कठीण परस्थितीतून मार्ग काढत शेख जफर यांची यशस्वी वाटचाल...!


💥एम.बी.ए परीक्षा उत्तीर्ण होत गावाला नावलौकिक मिळवून दिले💥

माजलगाव - प्रतिनिधी

 माजलगाव तालुक्यातील, नदीकाठचे सरवर पिंपळगाव हे एक जुने व नावजलेले गाव आहे.येथील महेबूब भाई हे एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत.बुद्धिवादी लोकात त्यांची गणती होते.रसिक मनाचे महेबूब भाई यांना एकूण चार मुले आहेत.सर्वात मोठा अथर शेख जो की पत्रकार आहे.दुसरा नंबर जफर शेख चा येतो ज्याने आत्ताच एमबीए परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे  तीन नंबरचा  मुलगा मौलाना मुदस्सीर असून चौथा मुलगा  अबुजर शेख हा ही पार्ट टाइम जॉब करत आपले शिक्षण पूर्ण करतच आहे.

 जफर चे एमबीए पास झाल्याने गावाला नावलौकिक प्राप्त होत आहे,कारण आई . वडील आजारी आसताना व घरची परिस्थिती बिकट असतानाही जफर शेख यांच्या यश संपदानाने शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.ज्या गावात पावसाळ्यात जायला वाट नाही त्या गावच्या मेहनती पोराने एमबीए सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे.वडील महेबूब भाई च्या जगण्याला बळ देणारी आहे.

सर्वच स्तरातून शेख जफर महेबूब यांचे कौतुक होत आहे. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या