💥पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव-गणपूर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर विशेष पथकाने घेतला ताब्यात...!


💥पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत अवैध चोरट्या रेतीने भरलेल्या टिप्परसह ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

पुर्णा (दि.१७ जानेवारी) - परभणी जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीसह अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी स्थापण केलेल्या विशेष पथकाने आज रविवार दि.१७ जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्री ०१-०० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कान्हेगाव-गणपूर रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर क्रमांक एमएच ०२ वायए ९८४१ हा अवैध चोरट्या अडीच ब्रास वाळूसह ताब्यात घेतला असून विशेष पथकातील धाडसी अधिकारी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,जमीर फरुकी,अजहर पटेल,विष्णु भिसे,दीपक मुदिराज,चालक अरूण कांबले यांनी अवैध वाळू तस्करी विरोधात केलेल्या या धाडसी कारवाईत अडीच ब्रास वाळूने भरलेल्या टिप्परसह ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून टिप्पर चालक राजु जटाळे याच्यासह मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे या घटनेत टिप्पर चालकास ताब्यात घेण्यात आलेले आहे....   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या