💥परभणी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अर्थखात्याकडे प्रस्ताव दाखल...!


💥गोरक्षणची काही जागा नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासाठी व उर्वरित मिळणार औद्योगीक वसाहती करिता💥

परभणी (दि.७ जानेवारी) - परभणी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालया करिता निश्चित केलेल्या गोरक्षणच्या त्या जागेचा रितसर असा प्रस्ताव उद्योग मंत्रालयाव्दारे अर्थखात्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती खासदार श्रीमती फौजिया खान व माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिली.

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची श्रीमती खान व अ‍ॅड.गव्हाणे यांनी आज गुरुवार दि.७ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथे मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली.या भेटीतून खा.खान व माजी आ.गव्हाणे यांनी उद्योगमंत्री देसाई यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मराठवाडा विकास मंडळाअंतर्गत दुय्यम कंपनीची म्हणजे गोरक्षणची जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी देसाई यांनी या अनुषंगाने अर्थखात्याकडे तांत्रिक मान्यतेकरिता प्रस्तावसुध्दा पाठवण्यात आला आहे,अशी माहिती दिली. 

दरम्यान, श्रीमती खान व अ‍ॅड. गव्हाणे यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याबरोबर अन्य विकास प्रश्नांबाबतची चर्चा केली. विशेषतः औद्योगीक वसाहतीकरिता जागा उपलब्ध करण्यासंदर्भातही व्यापर चर्चा झाली. गोरक्षणचीच सर्वसाधारणपणे चारशे एक्कर जागा उपलब्ध आहे. त्यापैकी काही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच उर्वरित जागा औद्योगीक वसाहतीकरिता उपलब्ध करण्याचा निर्णयसुध्दा उद्योगमंत्रालयाव्दारे घेतला गेला आहे, असे निदर्शनास आणून दिले.यावेळी अप्पासाहेब बालवडकर हे उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या