💥सोनपेठ तालुक्यात खानावळी/धाब्यांना आले बारचे स्वरुप...!


💥पोलिस प्रशासनाकडून कार्यवाही होणार का ? कारवाई संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित💥

सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी

खानावळीसाठी सुरू केलेल्या सोनपेठ शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या धाब्यावर मागील अनेक महिन्यांपासून देशी विदेशी दारूची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.या गंभीर बाबीकडे उत्पादन शुल्क विभागासह व स्थानिक पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.मात्र पोलिसांच्या वरदहस्तामुळेच खानावळीमधून दारूविक्री चालू असल्याचा आरोप ग्रामीण भागातून व्यक्त केला जात आहे.

परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना हे रुजू झाले.त्या दिवसापासून परभणी जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.सोनपेठमध्ये स्थानिक पोलीस या अवैध व्यवसायचालकांवर कार्यवाही करत नसल्याने पोलीस अधीक्षकांच्या मुख्य पथकासह गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोनपेठमध्ये तळ ठोकून अवैद्य धंदे करणाऱ्यांवर कारवाई करत जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाच्या माना उंचावलेल्या आहेत.परंतु या कार्यवाहीत सोनपेठ तालुक्यातील धाब्याना सवलत देण्यात आली का?अशी चर्चाही दबक्या आवाजात चालू आहे. यामुळे मात्र तालुक्यातील सर्व धाब्यावर सहज देशी-विदेशी दारू विक्री होत असून विक्री करणाऱ्यावर कधी कार्यवाही करणार..?असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सोनपेठ तालुक्यातील सर्वच परवानाधारक दारूची दुकाने व बिअरबार बंद करण्यात आले होते.त्यानंतर प्रशासनाने परवानगी देताच तालुक्यातील परवानाधारक विक्रेत्यांबरोबरच आता धाब्यावर सुद्धा दारू विक्रीला सुरुवात झाली आहे.सद्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणूका चालू आहेत.शहरासह तालुक्यातील सर्व धाबे,खानावळींना अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे.अवैद्य दारू विक्री करणाऱ्या धाबा चालकाकडून गुप्त ठिकाणी शेतामध्ये दारू लपवून ठेवल्या जाऊन ही दारू विक्री होत आहे.दारू पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला मागेल त्या कंपनीची देशी-विदेशी दारू तात्काळ उपलब्ध करून दिली जाते.यातील काही धाबाचालक हे बाहेरगावावरून होलसेल दारु विक्रेत्यांकडून दारूची खरेदी करत असतात तर काही जण धाब्यावर जेवणासाठी आलेल्या ग्राहकांनी दारूची मागणी करताच नजीकच्या बियर बार वरुन तात्काळ दारु उपलब्ध करून देतो असे म्हणून जवळच्या शेतातून ही दारू आणून देत असतात.याप्रकरणी यापूर्वी सोनपेठ पोलिसांनी अनेक वेळा अशा प्रकारची अवैध दारू विक्री करणार्‍यावर कठोर कार्यवाह्या केलेल्या आहेत.मात्र सध्या कार्यवाह्या केल्या जात नसल्याने सोनपेठ शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या धाब्यांवर आजही बिनदिक्कतपणे विनापरवाना दारूची विक्री सुरू आहे.अवैध व्यवसाय करणारे एवढे बोकाळले आहेत ते प्रशासनातील कुठल्याच अधिकाऱ्यांना जुमानत नसल्याने.यामुळे संबंधित प्रशासन अवैध दारू विक्री करणाऱ्यावर हतबल झाले की?मेहरबान झाले?असा सवाल उपस्थित होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या