💥भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


💥मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दिपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली💥

भंडारा (दि.१० जानेवारी) - येथील जिल्हा शासकी रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवार दि.१० जानेवारी २०२१ रोजी भंडारा येथे सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी आज रविवारी नागपूरहुन भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन  विश्वनाथ आणि दिपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,आग प्रकरणी एक टीम चौकशी करीत असून मुंबई अग्निशमन विभाग प्रमुख पी.एस. रहांगडाले यांना देखील यात सहभागी करून घेण्याचे निर्देश मी दिले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या