💥परभणी जिल्ह्यातील पाथरीतील माजलगाव रोडवरील अंजुमन फर्निचर या दुकानाला शॉट सर्कीट मुळे लागली आग....!


💥दुकानातील गाद्यांसह विवाह साहित्यासह फर्निचर जळून खाक परिसरातील नागरिकांच्या सतर्कते मुळे मोठा अनर्थ टळला💥


परभणी (दि.१० जानेवारी) जिल्ह्यातील पाथरी शहरातील माजलगाव रोडवरील पाथरी पोलिस स्थानकालगत असलेल्या व्यापारी संकुलातील व्यापारी शेख रसूल यांचे अंजुमन फर्निचर व गाधी भांडार या दुकानाला आज रविवार दि.१० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११-०० ते ११-३० वाजेच्या सुमारास शॉट सर्कीट मुळे अचानक आग लागल्याची भयंकर घटना घडली या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने मोठा अनर्थ टळला कारण या दुकानाच्या आसपास जवळपास तिस चाळीस दुकान असल्याने जागृत नागरिकांनी दाखवलेली सतर्कता व्यापाऱ्यांच्या हितावह ठरली दरम्यान या भयंकर आगीच्या घटनेत अंजुमन फर्निचर व गाधी भांडारच्या दुकान मालकांनी लगनसराई असल्याने मोठ्या प्रमाणात विवाह साहित्यासह फर्निचर साहित्याची खरेदी केलेली असल्याने या आगीत तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे दरम्यान या घटने नंतर बऱ्याच वेळाने अग्नीशमन दलाचा बंब पोहोचल्याचे समजते .... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या