💥सरदार लड्डूसिंघ महाजन यांचा अमृतमहोत्सव भव्य - दिव्य साजरा व्हावा : बैठकीत एकमत


💥महाजन यांनी नांदेडचा नावलौकिक केला - पोकर्णा 

नांदेड (दि.11 जानेवारी) गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार लड्डूसिंघ महाजन यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असून त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान पाहता त्यांच्या येणारा 75 वां वाढदिवस अमृतमहोत्सव भव्य - दिव्य  साजरा व्हावा असा सामूहिक विचार ता. 10-01-21 रोजी पार पडलेल्या एका तयारी समितीच्या बैठकीमध्ये प्रस्तुत झाला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नांदेडचे माजी महापौर बलवंतसिंघ गाडीवाले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री ओमप्रकाश पोकर्ना, स. गुरुचरणसिंघ घडीसाज, श्री विनायकरावजी नांदेडकर, स. सुरजीतसिंघ खालसा, स.रणबीरसिंघ रामगडिया, स. गुरबक्षसिंघ रामगडिया यांची उपस्थिती होती. स.लड्डूसिंघ महाजन यांची ही मंचावर उपस्थिती लाभली होती.


 
कार्यक्रमात आपले विचार मांडतांना श्री ओमप्रकाश पोकर्णा म्हणाले, नांदेड शहरात मोठ - मोठे व्यक्तिमत्व होऊन गेलेत ज्यांनी नांदेडचा विकास आणि नावलौकिक करण्यासाठी योगदान दिले. अशा श्रुंखलेत स. लड्डूसिंघ महाजन यांचे नाव अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या रुपात सदैव स्मरणार्थ राहील. राजकारण, क्रीडा, समाजसेवा, सांस्कृतिक किंवा धार्मिक क्षेत्र असो त्यांनी सर्वच क्षेत्रात हजुरसाहिब नांदेडचे नावलौकिक केले. 


श्री पोकर्णा पुढे म्हणाले, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष असतांना स. लड्डूसिंघ महाजन यांच्या पुढे अनेक समस्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात शीख विरोधी दंगली उद्भवल्या पण त्यावेळी मुंबई आणि नांदेड या दोन शहरात शांतता कायम राहिली त्यात स. लड्डूसिंघ महाजन यांचे मोलाचे योगदान होते. त्यावेळी लड्डूसिंघ महाजन यांना सरबत खालसा कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते पण त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला, जर प्रस्ताव स्वीकार केला असता तर त्यांना मंत्रीपद मिळाले असते. महाजन यांनी त्यावेळी धर्म आणि समाज यांना महत्त्व दिले असा व्यक्तिमत्व आमच्या सोबत नगरपालिकेत सहकारी होता आणि नांदेड मध्ये पार पडलेल्या गुरुतागद्दी त्रिशताब्दी विकास आणि सोहळा साजरा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा व्यक्तिमत्त्वाच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी प्रस्तावित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण देण्यात यावे. अशी सूचना देखील पोकर्णा यांनी केली. 

स. गुरुचरणसिंघ घडीसाज यावेळी म्हणाले, गुरुद्वारा बोर्डावर स. लड्डूसिंघ महाजन हे नांदेडचे रहिवाशी असलेले पहिले अध्यक्ष होत. त्यांनी नगरसेवक म्हणून राजकारणात  प्रवेश केला होता पण प्रत्येक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्यावर स्मरणिकेच्या माध्यमातून वेध घेण्याची गरज आहे.

श्री विनायकराव नांदेडकर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, अमृतमहोत्सव साजरा करण्याची सर्वांची इच्छा आहे. लड्डूसिंघ महाजन यांचा सत्कार यासाठी देखील योग्य असा आहे की, 1984 मध्ये देशभरात शीख विरोधी दंगली उसळल्या तरी नांदेड आणि मुंबई शहरं शांत होती. नांदेड शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लड्डूसिंघ महाजन यांनी गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष नात्याने मोठे प्रयत्न केले. त्यांनी केलेली असंख्य कार्यं अशी आहे की ज्यामुळे समाजाचा वेळोवेळी फायदा झाला. 

स. सुरजीतसिंघ खालसा यांनी आपले विचार मांडतांना सूचना केली की, अमृतमहोत्सवाचे महत्त्व जोपासण्यासाठी वृद्ध आणि विद्यार्थ्यांना मदत करावी. वृद्धाश्रमासाठी मदत द्यावी. 

दैनिक प्रजावाणीचे संपादक श्री शांतनु डोईफोडे यांनी यावेळी सूचना मांडली की, स. लड्डूसिंघ महाजन यांच्या कार्यांची व्यापकता लक्ष्यात घेता कार्यक्रम व्यापक स्तरावर साजरा करण्याचे नियोजन व्हावे आणि त्यासाठी सर्व जातिधर्म आणि घटकांचा समावेश करण्यात यावा.यासोबतच श्री विजय होकर्णे यांनी डॉक्युमेन्ट्री आणि फोटो प्रदर्शन तयार करण्याची सूचना केली. श्री उमाकांत जोशी, राजेंद्रसिंघ शाहू, प्रा. जुझारसिंघ सिलेदार, स. मंजीतसिंघ संधू, स. दीवानसिंघ बुंगाई, डॉ. प्रकाश निहलानी, डॉ. गिरीषसिंह पटेल, माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे, राजिंदरसिंघ सिद्दू, प्रा. चाँदसिंघ मास्टर, स. राजदेविंदरसिंघ कल्लाह, स. राजवंतसिंघ कदम यांनी मोलाच्या सूचना मांडल्या. डॉ. दीपक शिंदे आणि शरणसिंह सोढ़ी यांच्या सूचनांचे वाचन ही करण्यात आले. 

श्री स. बलवंतसिंघ गाडीवाले यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणात भावना प्रकट करतांना सांगितले की, लड्डूसिंघ महाजन यांनी नांदेड शहरात राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक सेवा क्षेत्र, धार्मिक क्षेत्रा सोबतच त्यांनी नगरसेवक म्हणुनही सेवा अर्पित केल्या आहेत. महाजन यांनी गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष नात्याने मोठमोठ्या नेत्यांसोबत काम केले किंवा चांगले संबंध प्रस्तापित केले. त्यात पंजाबच्या दोन ते तीन मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याशी होता. अनेक केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्र्यांचा त्यांच्या सुदृढ़ संबंध लक्ष्यात घेता हयातीत असलेल्या अशा नेत्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रण पाठवण्यात यावेत. यासाठी 'कार्यक्रम मुख्य समेती' आणि 'तयारी उपसमित्यांचे'  गठन करण्यात यावे. श्री गाडीवाले यांनी या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. 

💥सरदार लड्डूसिंघ महाजन यांनी आभार व्यक्त करतांना सर्वसूचनांचे स्वागत केले💥 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक स. रविंदरसिंघ मोदी यांनी केले आणि समाजात वृद्धांच्या सन्मानासाठी अमृतमहोत्सव सारखे सोहळे रुजविण्याची प्रथा बाळगावी अशी सूचना केली.

बैठक मध्ये स. इन्दरसिंघ शाहू, नारायणसिंघ नंबरदार, दर्शनसिंघ कोल्हापुरे,नारायणसिंघ तबेलेवाले,अमरजीतसिंघ महाजन, गुरमीतसिंघ महाजन, जगबीरसिंघ शाहू,मनप्रीतसिंघ कुंजीवाले, शेरसिंघ तबेलेवाले, संतसिंघ संधू, परशनसिंघ महंत, जगजीवनसिंघ रिसालदार,जगजीतसिंघ कोल्हापुरे,लालसिंघ त्रिकुटवाले,जगदीप सिंघ लांगरी,जसबीरसिंघ चड्डा,जगजीतसिंघ रामगडिया,सत्यनारायण सिंह तेहरा,शंकर सिंगेवार, महिंदरसिंघ पैदल, गुरप्रीतसिंघ सोखी,बीरेंद्रसिंघ बेदी,महिंदरसिंघ लांगरी,लालसिंघ संत,प्रभु शिंदे,अमरदीपसिंघ महाजन,वीरासिंघ महाजन सह मोठ्या संख्येत सर्वधर्मीय लोकांची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या