💥परभणी तालुक्यातील ५०-५५ गावातील शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न आ.राहुल पाटील यांच्या मुळे मार्गी लागला...!


💥शेतकरी व ग्रामस्थांनी मानले आमदार डॉ.पाटील यांचे आभार💥

परभणी (दि.४ जानेवारी) - तालुक्यातील टाकळी(कुं) येथे ३३ के.व्ही.उपकेंद्रामार्फत परभणी येथील १३२ के.व्ही. मध्ये उपलब्ध असलेला विजसाठ्यातून जवळपास ५०-५५ गावांचा वीजपुरवठा केला जातो. अजून ही दुसरा लोड असल्यामुळे या गावांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असे व यामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत असे. याबाबतीत शेतकऱ्यांची तक्रार आ.डॉ.राहुल पाटील यांच्या पर्यंत आली व त्यावर तोडगा काढण्यासाठी त्वरित वीजपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आ.डॉ.पाटील यांनी हा प्रश्न मार्गी लावला.टाकळी (कुं) येथील उपकेंद्रासाठी धर्मापुरी, टाकळी (कुं) व झरी असे स्वतंत्र फिडर करून यावर तोडगा काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. व शेतकऱ्यांचा खूप दिवसांपूर्वीपासून असलेला प्रश्न मार्गी लागला. यानंतर शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक व अखंडित वीजपुरवठा उपलब्ध असेल.

आज या सर्व गावातील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आ.डॉ.राहुल पाटील यांना भेटून त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांचे आभार स्वीकारतचं आ.डॉ.पाटील म्हणाले की ग्रामस्थांनी सर्व अडचणी माझ्यापर्यंत आणाव्यात त्यांना मार्गी लावण्यासाठी लागेल ते प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे अशी ग्वाही दिली. व ते म्हणाले की शेवटी मी आमदार जरी असलो तरीही त्याआधी मी जनसेवक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या