💥पुर्णा शहरातील क्रांतीनगर परिसरात खुल्या टेनिस बॉल सामने संपन्न...!


💥अतिम सामन्यात यंग बॉईज क्रांतीनगर या टीमने मारली बाजी💥 

पुर्णा (दि.५ जानेवारी) शहरातील क्रांतीनगर परिसरात खुल्या टेनिस बॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते 'क्रांतीनगर चषक' या नावाने ट्राफी ठेवण्यात आली होती. 


या ट्रॉफीमध्ये अंडर नाईन्टीनचे पूर्णा परिसरातील जवळपास दहा टीम ने सहभाग घेतला होता हे सामने पाच दिवस चालले आज मंगळवार दि.५ जानेवारी २०२१ रोजी अंतिम सामना खेळला गेला तो सामना आयोजन कमिटी व यंग बॉईज क्रांतीनगर पूर्णा त्यांच्यात खेळला गेला हा सामना अत्यंत रोमहर्षक व अतितटीचा झाला आणि शेवटी यंग बॉईज क्रांतीनगर या टीमने बाजी मारली यावेळी आयोजक टिम दुसऱ्या क्रमांकावर आली या सामन्याचे पहिले बक्षीस ४ हजार रुपये व ट्रॉफी आणि दुसरे बक्षीस २ हजार रुपये व ट्रॉफी हे दोन्ही बक्षीस रउफ महेबूब साहब कुरेशी यांच्याकडून दोन्ही टिमचे कप्तान अल्ताफ आणि बंटी यांना देण्यात आले आहे या वेळी संदीप नरवाडे व प्रेम इंगोले यांनी पंच म्हणून काम पहिले त्यांच्यासोबत यासीन पठाण यांनी सुद्धा परिश्रम घेतले रौफ कुरेशी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले प्रेम इंगोले यांनी सूत्रसंचालन आभार संदीप नरवाडे यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या