💥किसान युवा क्रांती संघटनेच्या पूर्णा तालुकाध्यक्ष पदावर मा.कंठीराम जाधव यांची निवड..!


💥त्यांची नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष मा.यशवंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे💥

 पूर्णा (दि.२१ जानेवारी) - किसान युवा क्रांती संघटनेच्या पूर्णा तालुकाध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्ते कंठीराम जाधव यांची निवड करण्यात आली आहे.किसन युवा क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढत आसते. 

या संघटनेच्या माध्यमातून गरीब शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्या सोडवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते.या संघटनेच्या तालुकाध्यक्ष कंठीराम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.त्यांची नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष मा.यशवंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या