💥जगातील मागास,वंचित लोकांच्या लढ्याचे प्रतीक म्हणजे भीमा कोरेगाव - डॉ राजेंद्र गोणारकर


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे होते💥

पूर्णा (दि.२ जानेवारी) - जगातील जे जे,उपरे,मागास,वंचित,बहिष्कृत ,अस्पृश्य त्यांच्या लढ्याचे प्रतीक म्हणजे भीमा कोरेगावचा लढा होय,असे प्रतिपादन सुप्रसिद्ध आंबेडकरवादी विचारवंत प्रा डॉ राजेंद्र गोणारकर यांनी बुद्ध विहार पूर्णा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि भीमा कोरेगाव च्या शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मोहनराव मोरे होते.

    सकाळच्या सत्रात डॉ  आंबेडकर चौकात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करून भीमा कोरेगाव च्या प्रतिकृती स्तंभास मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.बुद्ध विहारात शौर्य दिनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले,याप्रसंगी हृदयतज्ज्ञ डॉ.सिदार्थ भालेराव,नगराध्यक्षाचे प्रतिनिधी मा.नगरसेवक संतोष एकलारे,जेष्ठ समाजसेवक डॉ दत्तात्रय वाघमारे,प्रा माधव रोडे,संयोजन समितीचे कामगार नेते अशोक कांबळे,नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड,अनिल खर्गखराते,विरेश कसबे,सुनील जाधव,विजयकुमार जोंधळे,सीदार्थ भालेराव,यशवंत लोखंडे,गौतम जोंधळे,रौफ कुरेशी,आदी मान्यवरांची उपस्थिती होती,अभिवादन सभेत बोलतांना, डॉ गोणारकर म्हणाले की, जाती व्यवस्थेने समाजाचे आणि देशाचे फार मोठे नुकसान केले,त्यात स्त्री जातीचे अधिक नुकसान झाले,त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जाती नष्ट करून समातेचा संदेश दिला,आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी चालवत असतांना,त्यापुढे एक विशिष्ट ध्येय असले पाहिजे,या ध्येयापासून आपण आपण तसूभरही विचलित होणार नाही, त्याचे स्मरण सतत व्हावे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरां प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर सतत राहावी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बुद्ध विहारात शौर्य दिनी बसविण्यात आला आहे,असे मला वाटते.

       या प्रसंगी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी मान्यवरांचे शाल पुष्पहार देऊन सत्कार केले,स्वागतपर बोलतांना ते म्हणाले,प्रत्येकाला इतिहाहास घडवावा वाटतो,पण त्या इतिहासाची दिशा ही लोकहिताची असली पाहिजे,त्यासाठी त्याग करण्याची भावना ठेवली पाहिजे,या कार्यक्रमाचे मार्गदर्शक भदन्त डॉ.उपगुप्तजी महाथेरो यानी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले,यावेळी त्यांनी बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविणाऱ्या समितीस आशीर्वाद देऊन भविष्यात बुद्ध विहाराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या वस्तु दान देणारे समूह निर्माण झाले पाहिजे व बुद्ध विहार हे पूर्णेचे संस्कार केंद्र व्हावे,अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनविलेले मूर्तिकार व्यंकट पाटील यांना बुद्ध विहार समिती,पूर्णा, च्या वतीने सन्मानपत्र,शाल पुष्पहार देऊन गौरविण्यात आले,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूर्णा नगर परिषदेचे गटनेते तथा विद्यमान नगरसेवक उत्तम खंदारे यांनी केले,त्यांनी आपल्या प्रास्ताविकात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली, त्यांना धन्यवाद देत या पुढेही या कार्यक्रमाची प्रेरणा घेऊन बुद्ध विहारात चांगले उपक्रम राबविण्यासाठी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे अवाहन केले.

   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले,तर स्वागतगीत शाहीर विजय सातोरे यांनी गायिले.या कार्यक्रमास सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग,शहरांतील सर्व महिला मंडळे,तरुण वर्ग आदी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या