💥पूर्णा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोविड-१९ लसीकरणास प्रारंभ....!


💥प्रथम लसीचा मान समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संघरत्न जाधव यांना💥

पुर्णा : (दि.२५ जानेवारी) - येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड-१९ लसीकरणास सुरुवात झाली असून आज कोविड-१९ लसीकरणास सत्राचे उद्घाटन पूर्णेच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून  गट विकास अधिकारी अमित राठोड, गटशिक्षणाधिकारी श्री साबळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी मनीषा काळे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करून तालुक्यांमध्ये सर्व प्रथम समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संघरत्न जाधव यांना देण्यात आली. कोरोना विरुद्ध ची भारतामध्ये तयार झालेली लस अत्यंत प्रभावी आहे. सर्वांनी या लसीकरणात प्रतिसाद देऊन लसीकरण मोहिम यशस्वी करावे असे आवाहन यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी केले.



 प्रारंभी आरोग्य विभागाच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गिणगीने, डॉ.माजीद खान, डॉ. विजय बोरीकर, डॉ. गजानन राऊत, डॉ. मनोज दीक्षित, डॉ. कल्पना आळणे, डॉ. दिलीप रणवीर, डॉ. नागेश देशमुख, आरोग्य सहाय्यक चंद्रकांत काकडे आदीसह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला असून यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समूह संघटक माधव आवरगंड यांनी केले तर प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ. मनोज दीक्षित यांनी व्यक्त केले. मोहीम यशस्वीतेसाठी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका आदी परिश्रम घेत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या