💥परभणी जिल्ह्यासाठी ९ हजार ५०० कोविड लसीचे डोस उपलब्ध - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर


💥औरंगाबादहून लस घेऊन परभणीकडे वाहन निघाले असून ते काही तासात होणार परभणीत दाखल💥

परभणी (दि.१३ जानेवारी) - राज्यासह संपूर्ण जिल्ह्याला ज्या कोविड - १९ प्रतिबंधात्मक लसीची प्रतिक्षा होती ती लस काही तासात परभणीत दाखल होत असून पहिल्या टप्यात दिली जाणारी लस परभणी जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली असून ९ हजार ५०० इतके डोस प्राप्त झाल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 

परभणी जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी कोव्हिड लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी कोव्हिड लसचे ९ हजार ५०० डोस उपलब्ध झाले आहेत. औरंगाबादहून लस घेऊन परभणीकडे वाहन निघाले असून ते काही तासात परभणीत दाखल होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या