💥परभणी जिल्ह्यात आढळले आज शुक्रवार दि.२२ जानेवारी रोजी ४ कोरोनाबाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात आजपर्यंत ३११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान झाला मृत्यू💥 

परभणी (दि.२२ जानेवारी) - शहरासह जिल्ह्यात आज शुक्रवार दि.२२ जानेवारी २०२१ रोजी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेल्या १६ कोरोनामुक्त व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.दरम्यान आज शुक्रवारी २४२ जणांना लसीकरण मोहीमे अंतर्गत लस देण्यात आली.

शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात १०९ रुग्ण उपचार घेत आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत ३११ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ८९४ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ७ हजार ४७४ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शासकीय रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ६ हजार ३८० व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात ९८ हजार ३९ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ७ हजार ६९५ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५११ अनिर्णायक व १३५ नमुने नाकारल्या गेले असल्याचेही प्रेसनोटव्दारे सांगण्यात आले. 

दरम्यान, जिल्हा रुग्णालय, महानगर पालिकेच्या जायकवाडी परिसरातील दवाखाना, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात व परभणी तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी दि.२२ जानेवारी रोजी २४२ आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या