💥पुर्णा तालुक्यातील गौर येथे एक दिवशीय कृषी महोत्सवाचे आयोजन...!


💥सदर कृषी महोत्सवांमध्ये कृषी संबंधित वेगवेगळे अठरा स्टॉल लावन्यात येणार💥 

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून जागतिक कृषि महोत्सव 2021 अंतर्गत एक दिवशी कृषी महोत्सवाचे आयोजन मौजे गौर् तालुका पूर्णा जिल्हा परभणी याठिकाणी दिनांक 26 जानेवारी 2021 वेळ सकाळी ठीक 8 ते सायंकाळी 5 या दरम्यान करण्याचे योजले आहे सदर कृषी महोत्सवांमध्ये सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती त्याच प्रमाणे अध्यात्मिक शेती व व रासायनिक शेतीचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय इत्यादी विषयावर इत्यंभूत माहिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत सदर कृषी महोत्सव विशेष आकर्षण म्हणजे सदर कशी महोत्सवांमध्ये कृषी संबंधित वेगवेगळे अठरा स्टॉल लावण्यात येणार आहेत त्याच प्रमाणे सेंद्रिय शेती याबाबतीत तज्ञ शेतकरी बंधूंचे मार्गदर्शन लाभणार आहे सदर कृषी महोत्सवासाठी तालुका कृषी अधिकारी श्री तांबिले व तालुका पशुवैद्यकीय अधिकारी श्री कार्ले  हे आपले अनमोल असे मार्गदर्शन करणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बंधूंनी सदर कृषी महोत्सवासाठी यावे आवाहन 

 श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र गौर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 *ठिकाण: सोमेश्वर मंगल कार्यालय* *गौर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या