💥पुर्णेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या स्मारक बांधकामाचा भुमीपुजन सोहळा संपन्न...!

 


💥जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले भुमीपुजन💥

पूर्णा (दि.२६ जानेवारी) - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज मंगळवार दि.२६ जानेवारी २०२१ रोजी पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाचे भूमी पूजन सोहळा परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या भुमीपुजन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे परभणी जिल्हा प्रमुख विशाल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुर्णा नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई सितारामआप्पा एकलारे व त्यांचे प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक संतोष एकलारे यांनी पुर्णा नगर परिषद निवडणूक काळात सन २०१५ यावर्षी निवडणूक वचननाम्यात शहरात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे पुर्णाकृती पुतळे बसवण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनांची पुर्ती त्यांनी केल्याचे निदर्शनास येत असून आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित स्मारकाचे ज्या प्रमाणे उदघाटन करण्यात आले त्याच प्रमाणे लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या स्मारकाचेही भुमीपुजन लवकरच होणार असल्याचे नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे यांनी म्हटले आहे. 

या भुमीपुजन सोहळ्यास परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा विद्यमान उपनगराध्यक्ष विशाल कदम नगराध्यक्षा श्रीमती गंगाबाई एकलारे त्यांचे प्रतिनिधी संतोष एकलारे,पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.गोवर्धन भुमे,शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजा कदम,शिवसेनेचे मा.शहर प्रमुख नितीन उर्फ बंटी कदम तर प्रमुख अतिथी म्हणून महिला व बाल कल्याण सभापती सौ.विमलबाई लक्ष्मणराव कदम,पाणीपुरवठा सभापती मो.हाजी खलील कुरेशी,बांधकाम सभापती सौ.रेखा अनिल खर्गखराटे,मा.उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उत्तम खंदारे,नगरसेवक ॲड.राजेश भालेराव,नगरसेवक शाम कदम,नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड,नगरसेवक ॲड.धम्मा जोंधळे,नगरसेवक गणपती घोरपडे,नगरसेवक विरेश कसबे,नगर सेविका शमीम चाँदसाहब बागवान,नगरसेविका सौ.लता सुधाकर खराटे,नगरसेविका शमीम बेगम शरीफ,नगरसेविका शेख मन्नाबी बशीर,नगरसेविका सौ.पार्वती गाढवे,नगरसेविका सौ.सुमन मधूकर गायकवाड,नगरसेविका सौ.लिलावतीबाई गणपतराव पंडीत,नगरसेविका महेमुदा बेगम शेख महेबुब कुरेशी,नगरसेविका नाहिद अंजूम अमजद यांची उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांची विशेष उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या