💥भारतामध्ये नव्या रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट सुरूच; गेल्या 24 तासांत देशात केवळ 18,139 नव्या रुग्णांची नोंद...!


💥उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घसरण सुरूच,2.25 लाखापर्यंत खाली आली💥

नवी दिल्ली : भारतामध्ये नव्या रुग्णांच्या दैनंदिन संख्येत घट सुरूच  आहे.  गेल्या 24 तासांत देशात केवळ 18,139 नव्या रुग्णांची नोंद झाली.नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट सुरूच असल्याने एकूण उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 2,25,449 इतकी आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण 2.16 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

गेल्या 24  तासांत 20,539 रुग्ण बरे झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या एकूण संख्येत  2,634 इतकी निव्वळ घट झाली. खालील आकृती गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील बदल दर्शवते. महाराष्ट्रात 307 नवीन रुग्ण आढळल्यामुळे  सर्वाधिक सकारात्मक बदल नोंदवला गेला, तर केरळमध्ये 613 इतकी रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे जास्त नकारात्मक बदल दिसून आला.बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने नुकताच 1 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या दैनंदिन संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे ही संख्या वेगाने वाढत आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  10,037,398 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढून 96.39 % झाला. काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 79.96 टक्के रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात असल्याचे दिसून आले आहे.

केरळमध्ये 5,639 इतक्या सर्वाधिक संख्येने काल रुग्ण बरे झाले. गेल्या 24 तासांत  तर पश्चिम बंगालमध्ये 1,295 रुग्ण बरे झाले. नवीन रुग्णांपैकी 81.22 % रुग्ण  10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.केरळमध्ये दररोजच्या नवीन रुग्णांची संख्या सर्वाधिक 5,051 इतकी आहे. छत्तीसगडमध्ये 1,010  नवीन रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासांत 234 मृत्यूंची नोंद झाली आहे.नवीन मृत्यूंपैकी 76.50 टक्के मृत्यू आठ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यूची नोंद  (72) झाली आहे तर  केरळ आणि दिल्लीत अनुक्रमे 25 आणि 19 मृत्यू झाले आहेत.भारतातील दर दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण 109 आहे. 18 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात दर दहा लाख  लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. 

दुसरीकडे, 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील दर दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.दिल्लीत दर दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक (569) इतके आहे. ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 82 वर पोहचली  आहे.

💥मागील 24 तासांत महाराष्ट्रात 2,890 रुग्ण बरे झाले💥  

महाराष्ट्रात आज 3693 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2890 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1858999 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 51838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.75% झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या