💥परभणी जिल्ह्यात आज मंगळवारी आढळले १५ कोरोना बाधित रुग्ण....!


💥जिल्ह्यात आज एका कोरोना बाधीताचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू💥

परभणी (दि.१५ डिसेंबर) - परभणी शहरासह जिल्ह्यात आज मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२० रोजी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.तर रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन बरे झालेल्या २१ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून जिल्ह्यात रुग्णालयात उपचारा दरम्यान एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कोविड कक्षात एकून भरती रुग्ण १०५ आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत २९७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ७ हजार ३९५ कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून ६ हजार ९९३ कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या