💥गंगाखेड तालुक्यातील माखणीच्या स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द...!


💥स्वस्त धान्य दुकानदाराच्या गैरकारभाराला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मानले गोविंद यादव यांचे आभार💥 

गंगाखेड (११ डिसेंबर) : तालुक्यातील माखणी येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना निलंबीत करण्यात आला आहे. सदर कारदुकानदाराबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. या कारवाईचे गावकऱ्यांनी स्वागत केले असून  निलंबनासाठी पाठपुरावा करणारे तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांचा प्रत्यक्ष भेटून सत्कार केला.


 
माखणी येथील स्वस्त धान्य वितरक मधुकर बुवाजी भालेराव यांच्या वीतरण पद्धतीबद्दल ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी होत्या. नियमात धान्य वितरीत न करणे, कमी धान्य देणे, जास्त किंमत आकारणे आदिंबाबत गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. यावरून त्यांच्यावर अनामत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. परंतू या नंतरही वितरकाने त्यांच्या कार्यपद्धतीत बदल केला नाही. यावरून पुन्हा गोविंद यादव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार स्वरूप कंकाळ यांची भेट घेवून तक्रार करण्यात आली. यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी भालेराव यांचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे आदेश निर्गमित केले. 


श्रीमती माया कांबळे, रेखा भालेराव, शालूबाई भालेराव, शालुबाई शिंदे, गंगा मोरे, आशाबाई गुरव व ईतर गावकऱ्यांनी याकामी पुढाकार घेतला होता. नंदकुमार शिसोदे यांनी त्यांना सहकार्य केले. दरम्यान, या कारवाईनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे. पेढे वाटून आनंद व्यक्त करतानाच यापुढे सर्वांना योग्य दरात, योग्य प्रमाणात धान्य मिळेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या