💥परभणीतील वाळलेल्या तुरीच्या पिकांची सखाराम बोबडे यांच्याकडून पाहणी...!


💥तुरीचा पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासंदर्भात बोबडे यांची जनजागृती💥

परभणी लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्याच्या वाळलेल्या तुरीच्या पिकाची पाहणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आज शनिवार दि.१९ डिसेंबर २०२० रोजी केली.

तुरीचा पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सखाराम बोबडे पडेगावकर हे मागील आठ दिवसापासून जिल्ह्यात फिरत आहेत. वाडी, तांडा, वस्तीवर शेतावर जाऊन पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी वाळलेल्या तुरीच्या तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहान ते करताहेत. यासंदर्भात त्यांनी आज पडेगाव येथील शेतकरी संभाजी बोबडे यांच्या पिकाची पाहणी केली. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी तुरीचा पिक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी आपली तूर वाळली असल्यास कंपनीच्या ॲप वर जाऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन त्यांनी केले.जे शेतकरी तक्रार दाखल करतील तेच विमासाठी पात्र असतील असेही शेवटी बोबडे यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या