💥केंद्रातील मोदी सरकारने देशात लागू केलेला नवीन शेती विषयक कायदा रद्द करण्यात यावा...!


💥पुर्णा तालुक्यातील कांग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसिलदारां मार्फत केली मागणी💥   

पूर्णा (दि.८ डिसेंबर) - केन्द्र सरकारने पारित केलेले शेतकरी व् कामगार विरोधी नवीन कायदे रद्द करण्यात यावे व् शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पूर्णा कांग्रेस तर्फे बंदला पाठीबा दिला हे निवेदन मा टेमकर  मैडम  तहसीलदार पूर्णा ,व् ए, एन, बरकुल साहेब डिप्टी कलेक्टर प्रोव्हेकेशनरी यांच्या मार्फत मा पंत प्रधान नरेंद्र मोदीजीना पाठविण्यात आले 

या काळ्या कायद्यामुळे  शेतकरी कामगार मजूर  आड़ते , मुनीम हमाल हे सर्व लोक बेरोजगार होणार आहेत व् कृषि उत्प् न्न बाजार समित्या नष्ट होणार असून  हमी भाव सुध्दा शेतकऱ्याना भेटणार नाही हा कायदा शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून शेतकऱ्यांच्या  विरोधात आहे आज पंजाब हरियाणा व् देशभरातील  शेतकऱ्यांच्या आंदोलनास आपन भेट न देता व् त्या शेतकऱ्यांचे  विचार सुध्दा विचारत  नाहीत 

आज केन्द्रातील विरोधी पक्षात असलेल्या कांग्रेस व सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या या बंदला पाठीबा दिला आज पूर्णा शहर व्यापाऱ्यानी आपली दुकाने बंद ठेवुन या बंदला पाठीबा दिला या निवेदनावर वहीद कुरैशी जिल्हा उपाध्यक्ष, डॉ, संजय लोलगे  ता, अध्यक्ष शंकर पुंडगे जिल्हा सरचिटणीस अहेमद हुजूर जेष्ठ नेते कैलास मोरे  अध्यक्ष ता, किसान सेल  अब्दुल रशीद शहर अध्यक्ष अल्पसंख्यक  नईमोद्दीन शैक ता, उपाध्यक्ष अल्पसंख्यक सोपान बोबडे यांच्या सहया आहेत.,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या