💥विज वितरण कंपनीतील नौकर भरतीत मराठा तरुणांना एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून संधी देण्यात यावी...!


💥मराठा क्रांती मोर्चाचे विजवितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन💥

परभणी (दि.२ डिसेंबर) - वीज वितरण कंपनीत करण्यात येणार असलेल्या नोकर भरतीत मराठा तरुणांना एसईबीसी आरक्षणाच्या माध्यमातून संधी देण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे आज मंगळवार दि.२ डिसेंबर रोजी जिंतूर रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या मुख्यकार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुभाष जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, विठ्ठल तळेकर, विजय जाधव, किशोर रनेर, दिनकर गरुड,  रघुनाथ भोसले, नितीन देशमुख, गजानन लव्हाळे, अरुण पवार आदींनी वीज वितरण कंपनीसमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले. यावेळीी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण राज्यात वीज वितरण कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवारी आंदोलने करण्यात आली. वीज वितरण कंपनीत होणारी पदभरती तातडीने रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी संतप्त पदाधिकार्‍यांनी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचा जाहीर निषेध करीत त्यांच्या राजीन्याची मागणीही यावेळी केली.

दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या