💥परभणी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाच्या दहा आंदोलनकर्त्या पदाधिकार्‍यांना अटक व सुटका...!


💥नवामोंढा पोलिसांनी आज सोमवार दि.१४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी अटक करीत सुटका केली💥

परभणी (दि.१४ डिसेंबर) - चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या संदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या वादग्रस्त निर्णयाच्या प्रतीची होळी करीत निषेध  नोंदवल्याबद्दल जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाच्या पदाधिकार्‍यांना नवामोंढा पोलिसांनी आज सोमवार दि.१४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी अटक करीत सुटका केली.

शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य सरचिटणीस माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, सचिव बळवंत खळीकर, कार्याध्यक्ष उदय देशमुख, उपाध्यक्ष संतोष धारासूरकर, उपाध्यक्ष सूर्यकांत हाके, अनिल तोष्णीवाल, पालक महासंघाचे महेश पाटील यांच्यासह आदींविरोधात गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी सर्वांना ताब्यात घेत सुटकाही केली.

दरम्यान, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांसाठी आकृतिबंध लागू करण्याबाबत विहित करण्यात आलेल्या निकषांबाबत शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केले. त्यानुसार यापुढे अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिपाई किंवा तत्सम पदे भरता येणार नाहीत, असे नमुद केले. त्याऐवजी या पदांसाठी शिपाई भत्ता ही वेतनेत्तर अनुदानात तरतूद करण्यात आली असल्याचे नमूद केले. या शासन निर्णयाचा जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ तसेच अन्य संघटनांनी तीव्र शब्दात निषेध केला. हा शासन निर्णय शिक्षण क्षेत्रावर तसेच चतुर्थ श्रेणी पदावर काम करणार्‍या गरीब जनतेवर अत्यंत अन्याय करणारा असून या पदावर काम करणार्‍या व्यक्ती या गरीब व सामान्य कुटूंबातील असतात. तेव्हा शासन निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या