💥डिग्रस बंधाऱ्याच्या मावेजासाठी संयुक्त मोजणीला गती...!

 


💥मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना झुडपांसह काट्यांचा अडथळा💥

पालम (दि.१५ डिसेंबर) : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्याच्या बॅकवॉटर खाली केलेल्या जमिनीसाठी पाटबंधारे व भूमिअभिलेख विभागाकडून संयुक्त मोजणी केली जात आहे. परंतु नदीकाठी काटेरी झुडपे, बाभळीचा मोठा अडथळा मोजणीत येत असून अधिकाऱ्यांना मोजणीसाठी पॉईंट काढताना झाडेझुडपे तोडण्याची वेळ येत आहे. त्याची पाहणी प्रत्यक्ष भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक व्ही.बी,अन्नमवार यांनी 14 डिसेंबर 2020 रोजी सिरपूर (ता. पालम) येथे केली.



गोदावरी नदीवरील डीग्रस उच्च पातळीचा बंधारा उभारून दशक लोटले. आत्ता कुठे मावेजा देण्यासाठी संयुक्त मोजणीला गती आली आहे.  आतापर्यंत फरकंडा, डिग्रस, जवळा (सर्व ता. पालम), महागाव, कळगाव, बानेगाव, धानोरा काळे, (सर्व ता. पूर्णा) येथील गावांतील शेतकऱ्यांना मावेजाचे वाटप करण्यात आले. तर गुळखंड, फळा, या गावातील जमिनीची संयुक्त मोजणी झाली परंतु मावेजा वाटप करण्यात आलेला नाही. उर्वरीत १८ गावातील जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे बाकी आहे. त्यात पालम तालुक्यातील सोमेश्वर, आरखेड, घोडा, शिरपूर, सायळ, कापसी, रावराजुर, उमरथडी, सावंगी समावेश आहे. तर गंगाखेड तालुक्यातील पिंपरी देखील मोजनीपासून वंचित आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वजुर, खरबडा या गावांची देखील मोजणी होणे बाकी आहे. शिवाय, परभणी तालुक्यातील धसाडी व अंगलगाव, ही दोन गावे देखील मोजणीविना आहेत.


या गावांच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे एकमेव मशीन उपलब्ध आहे. त्यातच अपुरे मनुष्यबळ, या समस्येला तोंड देत अधिकारी मोजणी करीत आहेत.   मंगळवारी 15 डिसेंबर 2020 रोजी पालम तालुक्यातील सिरपूर येथे मोजणी करण्यात येत आहे. येथील गळाटी नदीकाठी काटेरी झुडपे, बाबळी, पुराच्या पाण्यात पाहून आली काटे आदी अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. खुद्द भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक व्ही. बी,अन्नमवार यांनी 14 डिसेंबर रोजी शिरपूर ला भेट देतात पाहणी केली. विशेषतः दिवसभर अन्नाविना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी काम केले. काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दुपारचे भोजन देखील अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यात श्री. अन्नमवार, निमतांदर आर.एन. सवंडकर, दुरुस्ती लिपिक एस.के. नाईकनवरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सहायक ए.एन. पोनंम, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एस.एस. इंगोले, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बी.टी. रांवळकर यांचा समावेश आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या