💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडात विशेष पथकाने पकडला शासकीय राशनचा काळ्या बाजारात जाणारा २२० पोते गहू ....!


💥जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी विशेष पथकाने केलेल्या धाडसी कारवायांबद्दल पथकाचे केले अभिनंदन💥

परभणी (दि.४ डिसेंबर) - जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृतींसह अवैध व्यवसाईकांच्या विरोधात अक्षरशः संघर्षाचा बिगूल वाजवल्याचे निदर्शनास येत असून कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी स्थापण केलेल्या विशेष पथकाने काल गुरुवार दि.३ डिसेंबर रोजी शहरातील खंडोबा बाजार परिसरात 'मोका' कायद्यातून नेमकाच जमानतीवर सुटून येऊन घातक शस्त्र हातात घेऊन परिसरात प्रचंड दहशत माजवत गुन्हा करण्याच्या तय्यारीत असलेल्या मनोज पंडीत याला तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई केल्याच्या घटनेला अवघे २४ तास ही उलटत नाही तोच विशेष पथकाचे 


कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले यांच्यासह पथकातील कर्तव्याशी एकनिष्ठ असलेले पोलीस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने ,शंकर गायकवाड़,विष्णु भिसे ,दिपक मुदिराज यांनी आज शुक्रवार दि.४ डिसेंब२०२० रोजी सकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील गंगाखेड येथे राज्य परिवहन मंडळ बिडच्या मालवाहतूक बस क्र.एम.एच.२० बिएल ००६७ या वाहना मधून परली येथून नांदेड कडे काळ्या बाजारात जाणारा शासकीय राशन दुकानाचा २२० पोते गहू पकडल्याची अत्यंत धाडसी कारवाई केली. विशेष पथकाने केलेल्या या धाडसी कारवाई बद्दल जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीणा व जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक श्री मुमका सुदर्शन यानी अभिनंदन केले आहे.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या