💥पूर्णा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन कामगार सेनेच्या धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस...!


💥शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती💥

पूर्णा (दि.१६ डिसेंबर) : पूर्णा नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील नागरिक मागील 25 नोव्हेंबर पासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने धरणे आंदोलनास सुरूवात करण्यात आली असून या धरणे आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.पूर्णा नदीवरील जेकवेल मधील 75 एचपी चा फुटबॉल असेम्बली खराब झाली असून नगर परिषद प्रशासनाकडून जेकवेल दुरुस्तीचे काम तब्बल विस दिवसापासून कासव गतीने चालू आहे नगर परिषद प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याने शहरातील नागरिकांची भटकंती होत आहे. 

पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या आदेशानुसार 02 डिसेंबर रोजी पूर्णा शहरातील पाणी पुरवठा पुढील 10 दिवस खंडीत राहील असे प्रसिद्धी करण्यात आले होते, पण अध्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, 

25 नोव्हेंबरला पूर्णा नदी पत्रातील जेकवेल मधील फुटबॉल बिघडले असून, 02 डिसेंम्बर रोजी 08 दिवसानंतर अलासमेंट करण्यात आले की, 10 दिवसात पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल, परंतु अध्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाल्याचे दिसून येत नसल्यामुळे आणखी किती दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागेल याचा जाब मुख्याधिकारी यांना विचारण्यासाठी रिपब्लिकन कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष जनाब महेबूब कुरेशी यांनी नगर परिषद पूर्णा च्या प्रांगणात धरणे आंदोलनाचा दुसऱ्या दिवसाला सुरुवात केली आहे, धरणे आंदोलनात सहभागी जनाब महेबूब कुरेशी, रमेश सरोदे, जलील कुरेशी, संजय वाघमारे इत्यादी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या