💥पुर्णा तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील सातेफळ गावात मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारूची विक्री...!


💥सातेफळ गावातील युवकांनी दिली जिल्हा पोलिस अधिक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार💥 

पुर्णा (दि.९ डिसेंबर) तालुक्यातील चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अवैध चोरट्या रेतीची तस्करी,अवैध मटका जुगारासह अवैध गुटखा विक्रीसह अवैध तस्करी परिसरातील गावागावात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीने उच्चांक काठल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील अनेक गावांतील नागरिक अक्षरशः त्रस्त झाल्याचे पाहावयास मिळत असून चुडावा पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक देवकते या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात संपूर्णपणे अकार्यक्षम ठरत असल्याने यापुर्वी ही अनेकांनी त्यांच्या विरोधात पुर्व जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या काळात तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीवर पुर्व जिल्हा पोलिस अधिक्षकांनी आरोपांच्या चौकशी समिती सुध्दा नेमली होती परंतु चौकशी समितीने यावर काय अहवाल दिला याचा उलगडा अद्यापही झाला नसल्याचे समजते या नंतर सुध्दा चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील अवैध धंदे सातत्याने चालूच असल्याने निदर्शनास येत आहे.

दरम्यात चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मौ.सातेफळ येथील सुजान नागरिकांनी सातेफळ गावातील अवैद्य दारू विक्री बंद करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर घेराव आंदोलन करू असा इशारा देत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री.दिपक मुगळीकर यांच्यासह जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याच्या मागणी संदर्भात आज बुधवार दि.९ डिसेंबर २०२० रोजी तक्रार अर्ज दिला असून अर्जात असे नमूद केले आहे की मौ.सातेफळ येथील अवैद्य दारू विक्रीचे अतिप्रमाण झाल्यामुळे गावातील अनेक संसार उद्ध्वस्त झाली आहेत त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद होण्याची आवश्यकता असल्याने सातेफळ गावातील नवयुवक संघटनेचे मनोहर चव्हाण व युवा संघर्ष शक्ती चे बालाजी चव्हाण यांनी आज बुधवारी पोलिस अधीक्षक परभणी यांच्याशी संपर्क साधून निवेदन दिले व दोषींवर येत्या आठ दिवसात कार्यवाही करा अन्यथा सर्व संघटनांच्या व गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव आंदोलन करू असेही निवेदनात म्हटले आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या