💥महाराष्ट्र विधानसभेच्या सदनात प्रश्न उपस्थित करणे बनले ब्लॅकमेलिंगचे साधन - खासदार इम्तियाज जलील


💥औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर साधला आमदारांवर निशाणा💥

औरंगाबाद (दि.२४ डिसेंबर) - महाराष्ट्र विधानसभेत प्रश्न (एलएक्यू) उपस्थित करून विकासकामांचे कंत्राटदार अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काही आमदारांचे साधन बनले आहे असा खळबळजनक गंभीर आरोप औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केला असून त्यांनी असे म्हटले आहे की विधानसभेत प्रश्न (एलएक्यू) उपस्थित करायचे आणि त्याआडून शासकीय विकासकामांचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे धंदे काही आमदार करीत आहे असेही ट्विटमध्ये खा.इम्तियाज जलील यांनी म्हटले असून पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की विधानसभा अधिवेशन काळात उपस्थित केले जाणारे लक्षवेधी प्रश्न (एलएक्यू) आणि ते प्रश्न विचारण्याचा उद्देश यावर नजर टाकताच यात काहीतरी काळेबेरे असल्याचे लक्षात येते असेही त्यांनी म्हटले असून पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की मी केलेले ट्विट आणि उपस्थित केलेला मुद्दा काही नवा नाही खासदार इम्तियाज जलील यांनी केलेला हा गंभीर आरोप सर्वसामान्य जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या चारित्र्यावर निश्चितच गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या