💥ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत ट्रॅव्हल चालकाची ट्रॅक्टरला जोरदार धडक....!


💥ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान💥

(नदिम तांबोळी) 

पाथरी/ (२० डिसेंबर) - माजलगाव-पाथरी हायवेवर, मुंजा फाटा पाथरी येथे आज दिनांक १९-१२-२०२० रात्री एक च्या सुमारास फुल स्पीड मध्ये धावणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल क्रमांक एम.एच ०९ ई. एम ९०९२ गाडीने ऊस वाहतूक करत असलेले ट्रॅक्टर क्रमांक एम.एच २१ डी ३३६६ ला पाठीमागून ओव्हरटेक करण्याच्या धुंदीत व दुसऱ्या ट्रॅव्हल्स आपल्या पुढे जाऊ नये या विचारात झालेल्या गडबडीत, समोरील उसाच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक देऊन स्वतःचे व ट्रॅक्टर चे लाखो चे नुकसान केले.

 सदरील धडक ही एवढी जोराची होती की ट्रक्टरचा मागचा ट्रेलर उसासोबत पलटी झाला असे ट्रक्टर ड्रायव्हरने सांगितले. यात ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे .ही घटना घडल्यानंतर पाथरी येथील बरेच नागरीक घटनास्थळी धावून आले,मानवतेच्या नात्याने ट्रॅव्हल व ट्रक्टर मधील लोकांना सुखरूप बाहेर काढले.यामधील दोन तीन लोकांना किरकोळ जखमा झाल्याचे कळते.यावेळी पाथरीचे नगरसेवक शाकेर सिद्दीकी,सोमठाणा चे सरपंच बिस्मिल्ला खान,मोरेश्वर हॉटेल मालक पंढरीनाथ लांडगे,निसार खान यांनी एल अँड टी कंपनी च्या मदतीने रहदारीचा रास्ता मोकळा करून दिला बाकी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या समस्या दूर करण्यास मदत केली.

घटनास्थळी पाथरी पोलिसांनी पंचनामा केला आहे.ट्रॅव्हल ड्रायव्हर चे नाव शेषेराव पिटलेवाड आहे. असे कळते की तो अपघात झाल्यानंतर फरार झाला होता,तेही पेसेंजर ला वाऱ्यावर सोडून.एक मात्र खरं आहे की ट्रॅव्हल्स व्यवसायात निर्माण झालेल्या जीवघेण्या स्पर्धेत सामान्य लोकांचा जीव धोक्यात आला आहे तसेच ट्रॅक्टर वाल्याचें नुकसान आता भरून मिळेल हाही प्रश्न आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या