💥परभणीत शिवसेनेने केंद्र सरकाने केलेल्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ केले आंदोलन...!


💥केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोड्यांचा दिला जोरदार प्रसाद💥 

परभणी (दि.१२ डिसेंबर) केद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशासह राज्यात सातत्याने डिझेस व पेट्रोलची दरवाढ करीत असल्याने तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारसह बेताल केंद्रीय मंत्री दाणवेंच्या निषेधार्थ आज शनिवार दि.१२ डिसेंबर २०२० रोजी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोड्यांचा यथेच्छ प्रसाद देत जोरदार आंदोलन केले.

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाचा संबंध चीन व पाकिस्तानशी जोडण्याचे बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करताना संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोड्यांच्छ प्रसाद देत तीव्र भावना व्यक्त केल्या. केंद्र सरकार सततची पेट्रोल व डिझेल दरवाढ करत असल्याने सामान्य जनतेस याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोलचे दर हे परभणी जिल्ह्यामध्ये जास्त असल्याने परभणीकरांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे मत जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा प्रमुख श्री.कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे, अर्जुन सामाले, शेख शब्बीर, दीपक बारहाते, सदाशिव देशमुख, संजय गाडगे, नंदू अवचार, अनिल सातपुते, काशीनाथ काळबांडे, रमेश डख, ज्ञानेश्वर पवार, मुंजाभाऊ कदम, जितेश गोरे, सखुबाई लटपटे, संजय सारणीकर, गजानन  देशमुख, संतोष एकलारे, बंटी कदम, शाम कदम, विजयससिंह ठाकूर, विशू डहाळे, मकरंद कुलकर्णी, विकास वैजवाडे, प्रदीप भालेराव, रामदेव ओझा, विलास अवकाळे, संतोष आबेगावकर, सविता मठपती, शिवा यादव, शेख मुकेश, विष्णू मोहीते आदींसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या