💥परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील महसला शिवारात विशेष पथकाची अवैध हातभट्टीवर धाड....!


💥पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत आठशें लिटर हातभट्टी रसायनासह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.१३ डिसेंबर) - जिल्ह्यातील पाथरी पोलिस स्थानकाच्या हद्दीतील महसला शिवारात आज रविवार दि.१३ डिसेंबर २०२० रोजी सायं.०५-०० वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींसह अवैध धंद्यांचे वाढते साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी स्थापण केलेल्या विशेष पथकाने जिल्हा पोलिस अधिक्षक मिना यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलिस अधिक्षक मुमका सुदर्शन यांच्या मार्गदर्शना प्रमाणे धाडसी कारवाई करीत बेकायदेशीररित्या चालणाऱ्या हातभट्टीवर धाड टाकून हातभट्टी दारू बनवण्यासाठी वापरात येत असलेला तब्बल ८०० लिटर रसायन साठा दारू निर्मितीसाठी लागणारे अन्य साहित्यासह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष पथकाचे कर्तव्यनिष्ठ पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार व पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले यांच्या नेतृत्वाखालील पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,नीलेश भुजबळ,यशवंत वाघमारे,राहूल चिंचाने,शंकर गायकवाड़,जमीर फरुकी,अजहर पटेल,विष्णु भिसे या विशेष पथकातील धाडसी व कर्तव्यनिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यांसह गुन्हेगारी प्रवृत्तीं विरोधात एकामागून एक धाडसी कारवाया करीत जिल्ह्यात मुंबई पोलिसांनाही मागे टाकल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक पदाचा पदभार अत्यंत कर्तव्यकठोर व शिस्तप्रीय असलेले पोलिस अधिक्षक श्री.जयंत मिना यांनी स्विकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यातील पोलिस दलाला एक बळकटी मिळाल्याचे दिसत असून सर्वसामान्य जनतेत पोलिस प्रशासना विषयी अत्यंत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या